'''कार्ले''' ही प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जाणारी ही लेणी आहेत. बुद्धाच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुण्यापासूनपुण्याच्या वायव्येला ६६ कि. मी. अंतरावर लोणावळ्यानजीक आहेत.कार्ले गुंफा ह्या बोरघाटात स्थित आहेत. बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणांहून तेर या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. इसवी सनपूर्व पहिले शतक ते इसवीसन पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेली. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी [[महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके|महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक]] म्हणून घोषित केलेले आहे.<ref>{{cite websantosh | दुवा=http://www.asimumbaicircle.com/Gazette%20Notification/pune/scan0006%20.pdf | प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=गॅझेट नोटिफिकेशन | ॲक्सेसदिनांक=१२ ऑक्टोबर, इ.स. २०१३}}</ref>कार्ला गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहेत.