"दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो योग्य वर्ग नाव using AWB
ओळ ३४:
कालेलकरांचा जन्म [[इ.स. १८८५]] साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सावंतवाडी|सावंतवाडीजवळच्या]] बेलगुंडी या गावी झाला. [[पुणे|पुण्याच्या]] फर्ग्युसन कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी 'राष्ट्रमत' या दैनिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. काही काळ [[वडोदरा|बडोदा]] येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या विद्यालयात सरकारविरोधी कारवाया चालतात, असे कारण दाखवून ब्रिटिश शासनाने हे विद्यालय बळजबरीने बंद करवले.
 
गंगाधर विद्यालय बंद पडल्यानंतर कालेलकर [[मोहनदास करमचंद गांधी]] यांच्या [[गुजरात|गुजरातमधील]] [[साबरमती आश्रम|साबरमती आश्रमाचे]] सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी गांधींजींच्या 'सर्वोदय' या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. गांधीजींच्या प्रेरणेमुळे [[गुजरात विद्यापीठ|गुजरात विद्यापीठाच्या]] स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही काळ ते या विद्यापीठाचे कुलगुरूही होते.
 
[[हिंदी भाषा|हिंदी भाषेच्या]] प्रचारासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतकले. त्यासाठी हिंदुस्तानी प्रचारसभेच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भारताच्या एकात्मतेसाठी हिंदी भाषेचा प्रसार होणे, त्यांना महत्त्वाचे वाटे. त्यासाठी त्यांनी भारतभर दौरे केले. त्यांच्या या भारत भ्रमणाच्या अनुभवांवर त्यांनी गुजराती, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये विपुल लेखन केले.
ओळ ५६:
[[वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठीमहाराष्ट्रामधील राजकारणी]]
[[वर्ग:इ.स. १८८५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू]]