"ग्रीक संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
==धर्मकल्पना==
 
झूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव होय. याबरोबर ग्रीक लोक हेरा, अपोलो, अॅथेना, व्हिनस, मर्क्युरी या देवतांची पूजा करत. ग्रीक संस्कृतीत प्रत्येक नगराची एक स्वतंत्र्य देवताही असे. प्रत्येक देवताला एक परंपरा असून त्याचा संबंध भौगोलिक परिस्थितीचा व समाजजीवनाशी होता. देवतांना पशुबळी दिला जात असे. धार्मिक विधीमध्ये प्रामुख्याने स्त्रिया पौरोहित्य करत. तसेच ग्रीकांचा मरणोत्तर जीवनावर व स्वर्ग-नरक या कल्पनांवरही विश्वास होता.
 
==क्रीडा==
 
क्रीडा क्षेत्रात ग्रीकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दर चार वर्षांनी सर्व ग्रीक नगरराज्यातील खेळाडू आॅलिपिंया या ठिकाणी एकत्र येत. तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा होत. या सामन्यांसाठी आॅलिपिंया येथील वनश्रीयुक्त जागेची निवड करण्यात येऊन तेथे ग्रीकांचे मुख्य दैवत झूसचे भव्य मंदिर बांधण्यात आले. मंदिरात झूसचा १२.१९ मीटर उंचीचा सुवर्ण व हिरेमाणकांचा पुतळा उभारला. दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात झूसच्या उत्सवार्थ आॅलिंपिक सामने भरवण्यात येत. सामन्यात धावने, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, कसरती इत्यादींचा समावेश असे. या आॅलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या काळात सर्व युद्धांना बंदी घालण्यात येई. आॅलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे सदभावना, मैत्री व शांतता यांचे प्रतीक मानले जाई. आजच्या आॅलिंपिक स्पर्धांचे मूळ प्राचीन ग्रीक कथेत आहे.
 
{{विस्तार}}