"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ६३:
१९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले. त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका [[विजया पाटील]] यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका [[मीनल मडकईकर]] यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.
 
यापूर्वीच शासकीय स्पर्धात विक्रम गाजवत ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ने संगीत ‘संशयकल्लोळ’, संगीत ‘शारदा’ या नाटकांत बक्षिसे मिळवली होती. त्या नाटकांचे प्रयोग स्पर्धेबाहेरही सुरू ठेवले होते. सुखटणकर ‘संशयकल्लोळ’मध्ये ‘भादव्या गडय़ा’चं काम मी करू लागले. ‘शारदा’मध्ये ‘सुवर्णशास्त्री’ किंवा ‘हिरण्यगर्भ’ या भूमिका ते करत असत.
 
त्यानंतर संस्थेने संगीत ‘मृच्छकटिकम्’ बसवले. [[नंदकुमार रावते]] यांनी दिग्दर्शन केले. [[आशालता वाबगावकर]], [[रामदास कामत]], खुद्द रावते यांच्या प्रमुख भूमिका नाटकात होत्या. ‘चेट’ या चावट पात्राचे काम सुखटणकरांना मिळाले. ती गद्य भूमिका होती. संस्थेने या नाटकाचे सुमारे २५ प्रयोग केले.