"मोहनदास सुखटणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १६:
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके = लेकुरे उदंड झाली, स्पर्श, दुर्गी
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव = श्रीपाद
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = शालिनी
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
ओळ ४७:
 
==कॉलेजचे शिक्षण आणि अभिनयाचे करिअर==
मोहनदास सुखटणकरांनी १९५२ साली मुंबईत चर्चगेटच्या जयहिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयात प्रवेशअर्ज भरण्यासाठी लांबच्या लांब रांगेत सुखटणकरांची [[सुनील दत्त]]शी ओळख झाली.. बी.ए.पर्यंत दोघे वर्गमित्र होते व. वर्गात एकाच बाकडयावर बसायचे.
 
महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी डॉ. [[चारुशीला गुप्ते]] यांनी जयहिंद मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करून सुखटणकरांना सचिव बनवले. या वाङ्मय मंडळांतर्गत विविध कार्यक्रम झाले.. महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ‘लग्नाची बेडी’ हे नाटक करून मंडळाने निधी जमा केला. त्‍या नाटकात मोहनदास यांनी ‘गोकर्ण’ची भूमिका साकारली होती. आत्माराम भेंडे, आशा भेंडे, बबन प्रभू ही व्यावसायिक रंगभूमीवर काम करणारी माणसेही त्यात होती.
 
त्यानंतर सुखटणकर विविध एकांकिका स्पर्धांमधून भाग घेऊ लागले. त्यांनी एकांकिकांतून फक्त विनोदी भूमिकाच केल्या नाहीत, तर गंभीरही केल्या. ‘वहिनी’ या एकांकिकेत त्यांनी ‘वल्लभ’ची गंभीर भूमिका रमाकांत देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारली.
 
‘मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालया’च्या स्पध्रेत [[चारुशीला गुप्ते]] यांच्या ‘आम्ही सारेच वेडे’चा प्रयोग झाला. त्यात सुखटणकरांनी एका प्रौढाची विनोदी भूमिका वठवून उत्कृष्ट अभिनयासाठी असलेले पारितोषिक मिळवले.
 
भारतीय विद्याभवनात ‘आंतर महाविद्यालयीन नाट्यस्पर्धा’ व्हायच्या. तिथे सुखटणकरांनी ‘भाऊबंदकी’त काम केले आणि. गंगाधर गाडगीळांच्या ‘वेडयांचा चौकोना’तही केले.. या दोन्ही नाटकांसाठी त्यांना बक्षीस मिळाले.
 
==कायद्याचे शिक्षण आणि अभिनय==
१९५८ साली बी. ए. झाल्यावर मोहनदास सुखटणकर मुंबईतच ‘गव्हर्नमेंट लॉ कॉलेज’मध्ये शिकू लागले.आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत या कॉलेजने सादर केलेल्या ‘बळी’ आणि ‘लाल गुलाबाची भेट’ या एकांकिकांसाठी त्यांना अभिनयाची प्रशस्तीपत्रके मिळाली.
 
==धी गोवा हिंदू असोसिएशन==
१९५९ साली महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धेत ‘इंडियन नॅशनल थिएटर’ने ‘अशीच एक रात्र येते’ हे प्रा. प्रभाकर ताम्हाणे यांचे नाटक सादर केले. त्यात भय्यासाहेब वकील ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका मोहनदास सुखटणकरांनी वठवली. या नाटकात त्यांच्याबरोबर प्रसिद्ध लेखिका [[विजया पाटील]] यांनी काम केले होते, तर भय्यासाहेब वकिलाच्या मुलीची भूमिका [[मीनल मडकईकर]] यांनी केली होती. या नाटकाच्या प्रयोगाला ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी सुखटणकरांनाला गाठून ‘तू गोव्याचा. आमच्या संस्थेत तू असलंच पाहिजेस,’ वगैरे गोष्टी सुनावल्या, आणि त्यांना ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’मध्ये घेतले.
 
यापूर्वीच शासकीय स्पर्धात विक्रम गाजवत ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ने संगीत ‘संशयकल्लोळ’, संगीत ‘शारदा’ या नाटकांत बक्षिसे मिळवली होती. त्या नाटकांचे प्रयोग स्पर्धेबाहेरही सुरू ठेवले होते. सुखटणकर ‘संशयकल्लोळ’मध्ये ‘भादव्या गडय़ा’चं काम मी करू लागले. ‘शारदा’मध्ये ‘सुवर्णशास्त्री’ किंवा ‘हिरण्यगर्भ’ या भूमिका ते करत असत.
 
त्यानंतर संस्थेने संगीत ‘मृच्छकटिकम्’ बसवले. [[नंदकुमार रावते]] यांनी दिग्दर्शन केले. [[आशालता वाबगावकर]], [[रामदास कामत]], खुद्द रावते यांच्या प्रमुख भूमिका नाटकात होत्या. ‘चेट’ या चावट पात्राचे काम सुखटणकरांना मिळाले. ती गद्य भूमिका होती. संस्थेने या नाटकाचे सुमारे २५ प्रयोग केले.
 
मोहनदास संस्थेत दाखल होण्यापूर्वी संस्थेच्या संगीत नाटकातील नायकाच्या भूमिका [[रामदास कामत]] करायचे, पण जेव्हा संस्थेत त्यांचे पर्दापण झाले तेव्हा त्यांना नायकाच्या भूमिका देऊन संस्थेने ‘युद्धस्य कथा रम्या’ आणि ‘मरणात खरोखर जग जगते’ ही गद्य नाटके रंगभूमीवर आणली. नाटकांचे प्रयोग चांगले झाले. मात्र लेखनाची बाजू अतिसुमार असल्यामुळे ही दोन्ही नाटके फारशी यशस्वी ठरली नाहीत. नाटके पडली, पण सुखटणकरांचे संस्थेतील स्थान पक्के होत गेले. आणि ते धी गोवा हिंदू असोसिएशनचे प्रमुख घटक झाले. संस्थेच्या बहुतेक नाटकांमधून त्यांनी कामे केली आहेत. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकात स्त्रीपात्र सोडून बहुतेक सर्व भूमिका मोहनदासांनी साकारल्या. कुठल्याही नाटकाचा प्रयोग बंद पडू दिला नाही. ‘लेकुरे उदंड जाहली’चे पाचशे प्रयोग केले. ‘लेकुरे..’चा प्रयोग परदेशातही झाला. ‘दुर्गी’, ‘स्पर्श’मधल्या त्यांच्या भूमिकांचे विशेष कौतुक झाले. ‘स्पर्श’तील भूमिकेसाठी मोहनदास सुखटणकरांना गौरवण्यात आले.
 
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणार्‍या ‘स्पर्श’ या नाटकातील ‘नाटेकर’ या भूमिकेमुळे सुखटणकरांना गंभीर भूमिकाही करता येते हे सिद्ध झाले. त्यांची ‘दुर्गी’तील मोरोबा नाडकर्णी ही भूमिकाही खूप गाजली. गोमंतकचे संपादक [[माधव गडकरी]] यांनी मोरोबा नाडकर्णीवर विशेष लेख लिहिला होता. पुढे ‘दुर्गी’वर ‘सावल्या’ नावाची ‘सावल्या’मध्ये मोहनदास सुखटणकरांबरोबर [[दामू केंकरे]] आणि [[भक्ती बर्वे]] यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
 
==अन्य कार्यक्रम==
* मोहनदास सुखटकर हे कुसुमाग्रजांच्या साहित्यावर स्वगत आणि काव्यवाचनाचा कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम करताना त्यांना अनेक ठिकाणी स्टँडिंग ओव्हेशन मिळायचे.
 
अभिनयाचा छंद हा छंद पुढे भविष्यात उत्पन्नाचे साधन बनू नये, म्हणून मोहनदास सुखटणकरांनी एलआयसीत नोकरी केली. १९९० साली ते एलआयसीतून निवृत्त झाले, तरी रंगभूमीसाठी काम करणे त्यांनी सोडलेले नाही. नोकरी आणि गोवा हिंदू असोसिएशनचे काम सांभाळून रेडिओ, टीव्ही, चित्रपट या माध्यमांतूनही ते कामे करतच राहिले.
 
 
 
 
 
 
 
 
Line ६७ ⟶ १०१:
* होनाजी बाळा (जान्या)
* लग्नाची बेडी (गोकर्ण)
* लेकुरे उदंड जाहली (दासोपंत)
 
==रंगकर्मी मोहनदास सुखटणकर यांनामिळालेले पुरस्कार==