"देवनागरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
No edit summary
ओळ १:
'''देवनागरी लिपी''' बऱ्याच [[भारत|भारतीय]] [[भाषा|भाषांची]] प्रमुख [[लेखन पद्धती]] आहे. [[संस्कृत]], [[पाली]], [[हिंदी]] , [[मराठी]], [[कोकणी]], [[सिंधी]], [[काश्मिरी]], [[नेपाळी]], [[बोडो भाषा|बोडो]], [[अंगिका]], [[भोजपुरी]], [[मैथिली]], [[रोमानी]] इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात.
[[चित्र:Devnagari used in Melbourne Australia.jpg|thumb| देवनागरी लिपीचा जाहिरातीत वापर - [[मेलबर्न]] [[ऑस्ट्रेलिया]] येथे .]][[चित्र:MarathiShilalekhYear1109Found AtParalMaharashtraIndia.jpg|इवलेसे|परळ, [[मुंबई]] येथे जुन्या लिपीत आढळलेला शिलालेख. हा इ.स ११०९ मध्ये कोरला गेला.]]
== देवनागरी ओळख ==
[[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी]], [[कोंकणी]], [[काश्मिरी]], [[सिंधी]], [[नेपाळी]] आणि [[रोमानी]]सारख्या काही भारतीय मुळांच्या भाषांची प्रथम लिपी ही देवनागरी आहे. देवनागरी लिपी ही अबुगिडा लेखनपद्धतीमध्ये मोडते. जगातल्या बहुसंख्य लिपींप्रमणे देवनागरीदेखील डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. देवनागरी लिपीचा विकसनकाल हा बराच मोठा असून ह्या लिपीचा ख्रिस्तपूर्व ५०० मध्ये असलेल्या ब्राह्मी लिपीपासून आताची देवनागरी लिपीचा विकास झालेला आहे. साधारणत: इसवी सनाच्या बाराव्या शतकात स्थिरावलेल्या लेखनपद्धतीस देवनागरी असे नांव उपयोजिण्यास आरंभ झाला असावा. प्रत्येक शब्दावर एक रेषा ओढली जाते. तिला शिरोरेषा म्हणतात. तिच्यामुळे लेखन नीटनेटके व सुंदर दिसते. ही एक ध्वन्यात्मक लिपी आहे व त्यामुळे इतर लिप्यांपेक्षा ([[रोमन]], [[अरबी]], [[चिनी]] इत्यादी) अधिक वैज्ञानिक आहे.
[[चित्र:MarathiHandwritingByKaviDasopantYear1530.jpg|इवलेसे|मराठी लेखक व कवी [[दासोपंत]] यांचे सुमारे १५व्या शतकातील लिहिलेले मराठी.]]
 
:जगातील विविध भाषांतील बहुतांश शब्द किंवा ध्वनी देवनागरी लिपीमध्ये जवळजवळ जसेच्या तसे लिहिता येऊ शकतात आणि रोमन किंवा इतर लिप्यांपेक्षा देवनागरीत सहज लिहिलेल्या शब्दांचा तुलनात्मकदृष्ट्या हुबेहूब उच्चार करता येतो.
 
ओळ १०:
[[भारत]] तसेच [[आशिया]] मधील अनेक लिप्यांचे( [[उर्दू]] सोडून) संकेत देवनागरीपेक्षा वेगळे आहेत. पण उच्चारण व वर्ण-क्रम इत्यादी देवनागरीसारखेच आहेत. त्यामुळे लिप्यंतरण करणे सोपे जाते. देवनागरी लेखनाच्या दृष्टीने सरळ, सुंदर आणि वाचनाच्या दृष्टीने सुपाठ्य आहे.
[[File:PublicTransportinMumbaiTicketUsingDevnagari.jpg|thumb|Devnagari used in Public Transport Tickets at [[मुंबई|Mumbai]]]]
[[चित्र:Marathi HandwritingRamdasSwamiYear1600.jpg|इवलेसे|[[रामदास स्वामी]] यांचे इ.स १६०० शतकातले देवनागरी हस्ताक्षर.]]
 
== देवनागरी : नांवाचा अर्थ ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/देवनागरी" पासून हुडकले