"वि.मा.दी. पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६२४ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
वि.मा. दीक्षित पटवर्धन (जन्म : २८ ऑगस्ट १९०८) हे एक विनोदी लेखन करणारे मराठी लेखक होते. विमादींनी आपल्या विनोदी लेखनाने एके काळी वाचकांना भरपूर हसविले. पटवर्धनांचे वाडवडील सावकारी करत. ब्रिटिशांनी १८०० च्या पुढेमागे हळूहळू काही एकवाक्यता आणेपर्यंतच्या काळात, शेकडो प्रकारची नाणी एकसमयावच्छेदेकरून हिंदुस्तानभर चालत असत. अशी नाणी एकमेकांत बदलून देणे आणि त्यासाठी 'बट्टा' कापून घेणे हे काम सावकार करत असत. उत्तर पेशवाईतील पुण्यात दीक्षित-पटवर्धनांची पेढी हे काम करत असे. ह्या दीक्षित-पटवर्धनांची बाग कोथरूडला होती. तिचेचे प्लॉट पाडून आजची 'पटवर्धन बाग' वसाहत झालेली आहे. मुंबईतल्या गिरगावातील ब्राह्मणसभा ज्या भागात आहे तो सर्व भाग एकेकाळी ह्या दीक्षित-पटवर्धन कुटुंबाच्या मालकीचा होता. त्यांच्या पुण्याच्या पेढीची मुंबईतही एक शाखा होती.
 
वास्तविकमुळात विमादीं हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक. परंतु या रूक्ष विषयाच्या अध्यापनाबरोबरच त्यांनी आपली विनोदप्रियता कायम ठेवली होती. ऑरगॅनिक केमिस्ट्रीसारख्या अवघड विषय विमादीं अत्यंत सुलभपणे शिकवीत असत. असे उत्तम अध्यापनकौशल्य असणार्‍या पटवर्धब सरांच्या तासाची विद्यार्थी आवडीने वाट बघत असत.
 
प्रसिद्ध लेखक [[पी.जी. वुडहाऊस]] यांचा मानसपुत्र जीव्ह्‌ज याला पटवर्धनांनी मराठी साहित्यात 'जीवा' या नावाने अजरामर केले. 'जीते रहो जीवा' 'जीवाची मर्दुमकी' यासारखी त्यांची पुस्तके त्यावेळी साहित्यात गाजली. मुलांसाठी 'हास्यकळ्या', 'किती हसाल?' ही पुस्तके, 'रत्‍ना' ही कादंबरी, 'साहित्य गुदाम' यासारखे विनोदी लेखांचे पुस्तक ही त्यांची पुस्तके त्यावेळी लोकप्रिय झाली होती.
* विजय कापडी (लालूचा घोडा. - २००९)
* मंगेश तेंडुलकर (संडे मूड)
* शिवराज गोर्ले (नग आणि नमुने)
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
५७,२९९

संपादने