"डेव्हिड रिकार्डो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: डेव्हिड रिकार्डो (जन्म १७७२, मृत्यू १८२३) हे एक ब्रिटिश अर्थतज्ञ...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
 
No edit summary
ओळ १:
डेव्हिड रिकार्डो (जन्म १७७२, मृत्यू १८२३) हे एक ब्रिटिश अर्थतज्ञ होते. १८१७ साली प्रकाशित झालेल्या “प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी अँड टॅक्सेशन” (“राजकीय अर्थव्यवस्था व करव्यवस्थेची तत्वे”) या त्यांच्या पुस्तकासाठी ते ओळखले जातात. या पुस्तकात रिकार्डो यांनी तत्कालीन जमीनदारी व्यवस्थेची टीका केली. या व्यवस्थेत काही थोड्या जमीनदारांच्या हातात अधिकाधिक जमीन व संपत्ती येते व सामाजिक असमतोल उत्पन्न होतो असे रिकार्डो यांचे मत होते. हा असमतोल टाळण्यासाठी जमीनीवर कर बसवला जावा असे त्यांनी या पुस्तकात सुचविले. पुढे औद्योगिक क्रांतीमुळे जमीनदारी व्यवस्थाच नाहीशी झाली व रिकार्डो यांचे असमतोलाचे भाकीत खोटे ठरले. परंतु त्यांच्यानंतर कार्ल मार्क्स या जर्मन अर्थतज्ञाने हाच असमतोलाचा विचार औद्योगिक भांडवरदारीस लावला.
 
त्यांचे २०१३ साली प्रकाशित झालेले पुस्तक, ल कापिताल ओ व्हुनेउनियेम सिएक्लं (“एकविसाव्या शतकात भांडवल”) हे पुस्तक अनेक देशांत सर्वाधीक खपाचे पुस्तक ठरले. प्रगत देशांतली आजची आर्थिक असमानता बघितली तर परिस्थिती एकोणिसाव्या शतकातल्या सारखीच आहे असे पिकेती यांचे मत आहे. त्यामुळे कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, इत्यादिंसारख्या सामाजिक विषमतेवर विचार करणाऱ्या विसाव्या शतकाच्या आधी होऊन गेलेल्या अर्थतज्ञांचे विचार आज पुन्हा बघण्यासारखे आहेत. परंतु या तत्कालीन अर्थतज्ञांकडे सामाजिक व वैयक्तीक संपत्तीची अचूक आकडेवारी नसल्यामुळे त्यांचे निष्कर्ष तर्कशुध्द नसून पुर्वग्रहदूषित असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अचूक आकडेवारी असलेल्या सायमन कुझनेट्स सारख्या विसाव्या शतकातल्या अर्थतज्ञांकडे बघितले तर त्यांचे निष्कर्ष मार्क्स प्रभृतींच्या उलटच नाहीत तर विसाव्या शतकातील शीत युध्दाच्या पार्श्वभूमीमुळे वेगळ्याप्रकारे पुर्वग्रहदूषित आहेत. उदाहरणार्थ, मार्क्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत सामाजिक संपत्ती काही थोड्या व्यक्तींच्या हातात—म्हणजेच खासगी भांडवलदारांच्या हातात—येऊन विषमता वाढत जाते व शेवटी भांडवलदारी व्यवस्थाच संपुष्टात येते. याउलट कुझनेट्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत केवळ सुरूवातीस सामाजिक विषमता वाढते व काही वेळाने संपत्तीच्या देवाणघेवाणीतून साहजिकच अार्थिक समता अस्तित्वात येते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतल्या भांडवलावरच्या या विरोधी कल्पनांचा पिकेती यांनी एकविसाव्या शतकात भांडवल या पुस्तकात एकविसाव्या शतकासाठी उहापोह केला आहे. पिकेतींकडे अचूक आकडेवारीचा सुकाळ असल्याने आधीच्या अर्थतज्ञांच्या तुलनेत त्यांच्या निष्कर्षांना विशेष धार आहे. या विश्लेषणातून पिकेती दाखवतात की जगात आज सर्वत्र आर्थिक विषमता वाढते आहे. ही विषमता कुझनेट्स-मार्गाने घटण्याची लक्षणे नाहीत. पुस्तकाच्या शेवटी ही वाढ रोखण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबद्दल काही सल्ले आहेत.