"हनुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३३:
'''हनुमान''' [[रामायण|रामायणातील]] एक लोकप्रिय व्यक्तिरेखा असून तो [[राम|रामाचा]] महान भक्त, दास, दूत मानला जातो. त्याचा जन्म [[अंजनी]] या वानरीच्या पोटी अंजनेरी येथे झाला होता. तो पवनपुत्र व महाबली होता व त्याला अनेक शक्ती जन्मतःच प्राप्त होत्या. लहानपणी त्याला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. ते बघून [[इंद्र|इंद्रासहित]] सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला व पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले [[वज्र]] हनुमानाच्या दिशेने मारून फेकले. त्या प्रहाराने हनुमान मूर्च्छित झाला. नंतर देवांनी त्याला 'तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल' असा शाप दिला.<br />
पुढे राम वनवासात फिरत असताना त्याच्याशी हनुमानाची भेट झाली व तो रामाचा निस्सीम भक्त बनला. [[रावण|रावणाने]] [[सीता|सीतेचे]] अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून [[लंका]] गाठली आणि रामाचा निरोप सीतेकडे पोचवला. रावणाच्या सैनिकांनी त्याला पकडून रावणासमोर उभे केले व त्याच्या शेपटीला आग लावली. तेव्हा त्याने आपल्या शेपटीने पूर्ण लंकेला आग लावली आणि परत जाऊन सीतेचे वर्तमान रामास कळवले. रामाने आपली वानरसेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केले. या युद्धात हनुमानाने रामाला मोठी मदत केली. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी हनुमानाने हिमालयात झेप घेतली आणि [[द्रोणागिरी]] पर्वत उचलून आणला. त्या पर्वतावर आढळणार्‍या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला व त्याचे प्राण वाचले.
हनुमान हे चिरंजीव आहेत म्हणजे ते अजूनही जिवंत आहेत. ते सर्वात बलवान आहेत. त्यांचा उल्लेख महाभारतात देखील येतो. त्यांनी महाभारतात अर्जुनाच्या ध्वजावर बसून त्याचे रक्षण केले होते .
 
श्रीरामाचे परम भक्त हनुमान यांना चिरंजीव म्हटले जाते.
==हेसुद्धा पाहा==
*[[श्री गणेश अथर्वशीर्ष]]
"https://mr.wikipedia.org/wiki/हनुमान" पासून हुडकले