"विकिपीडिया:चावडी/वादनिवारण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎sant: नवीन विभाग
ओळ ११५:
११:१४, ११ ऑगस्ट २०१४ (IST)Sahadevसन्त्
आपन् काय् लिहिनार् सन्त् म्हन्जे काय्?
 
== निरगुडी एक औषधी वनस्पती ==
 
''निरगुडी''
या वनस्पतीचा वापर शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर कुंपण म्हणून करतो. निरगुडी या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
औषधी उपयोग :-
१.शरीरावर कोणत्याही भागावर सूज आली असता त्या ठिकाणी निरगुडीच्या पाल्याचा शेक द्यावा.सूज कमी होण्यास मदत होते.
२.ज्यांना संधिवाताचा त्रास आहे असे रुग्ण निरगुडीचा पाला गरम करून त्या भागात लावावा किंवा निरगुडी तेलाने मसाज करावी.
३.ज्यांना लघवी होत नाही अशांनी निरगुडीच्या पाल्याचा काढा करून दिवसात ३-४ वेळा घेतल्यास लघवी व्यवस्थित होते.
४.शरीरावर जखम झाली असता त्यावर निरगुडीचा उबवलेला पाला बांधावा.
५.हाताला व पायाला कुरूप झाले असता त्या कुरुपावर ३-४ दिवस पाला गरम करून बांधल्यास कुरूप मुळापासून निघते.
६.निरगुडीच्या पाल्याचा काढा ताप येणाऱ्या रुग्णाला दिला असता फायदा होतो.
७.निरगुडीच्या पाल्याचा काढा प्याल्याने पचनशक्ती वाढते.
८.कान दुखत असल्यास निरगुडीचे तेल कानात सोडल्यास फायदा होतो.
९.निरगुडी चा पाला+फळ+फुल यांचा ज्यास्त उकळून तयार केलेला काढा नियमित घेतल्यास आरोग्यदायी शरीर ठेवता येते तसेच दमा,क्षय,खोकला,उलटी अपचन या विकारांपासून मुक्तता मिळते.
१०.हातापायांच्या तक्रारीवर निरगुडीचे तेल लाभदायक आहे.
११. स्रियांना मासिक पाळीचा त्रास असेल तर याचा काढा घेतल्यास त्रास दूर होतो.