"मराठी नाट्यसंगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
==अन्य माहिती==
काही वेळा संगीत नाटकापेक्षा त्यातील पदांच्या ध्वनिमुद्रिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. उगवला चंद्र पुनवेचा (बकुळ पंडित), ऐसा महिमा प्रेमाचा (रतिलाल भावसार), काटा रुते कुणाला (अभिषेकीबुवा), गुलजार नार ही मधुबाला (वसंतराव देशपांडे), दान करी रे (रामदास कामत), मर्मबंधातली ठेव ही (प्रभाकर कारेकर), मधुमीलनात या विलोपले (आशा भोसले), मानसी राजहंस पोहतो (ज्योत्स्ना भोळे) अशा नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाल्या आणि आजही आहेत. लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांची असंख्य उदाहरणे देता येतील.
शाकुंतल, सौभद्र या नाटकांच्या काळात नाटकांतील पदांची सं‘यासंख्या भरघोस होती. त्यामुळे नाटके रात्रभर चालत असत. बोलपटांच्या आगमनाने दोन-तीन तासांची कमरणूक सहज उपलब्ध झाल्याने संगीत नाटकांची गरज कमी होत गेली. तसेच या काळात संगीत नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेणे नाकारल्याने नाट्यसंगीतही मागे पडत गेले. ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेच्या कुलवधू, आंधळ्यांची शाळा, भूमिकन्या सीता आदि नाटकांनी १९४० च्या दशकात काही बदल करून आटोपशीर नाट्यसंगीत रसिकांसमोर आणले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला.
 
==संगीत रंगभूमीवरील काही महत्त्वाचे कलाकार==