"संयुक्त महाराष्ट्र चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7413186
छो Wikipedia python library v.2
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ८:
 
==पूर्वार्ध==
[[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] आपल्या राज्यकारभारासाठी [[भारत|भारताची]] विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. [[इ. स. १९२०]] रोजी [[नागपूर|नागपुरात]] झालेल्या [[कॉंग्रेसकाँग्रेस]] अधिवेशनाच्या वेळी भाषावर प्रांतरचेनेचा मुद्दा [[महात्मा गांधी|महात्मा गांधींनी]] मान्य केला होता. [[लोकमान्य टिळक]] हे देखील भाषावर प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला ,विशेषत: [[जवाहरलाल नेहरू|नेहरुंना]] , संकुचित व राष्ट्रीय एकात्मकतेला धोका वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा पाया [[इ. स. १९३८]] च्या अखेर वऱ्हाडात घातला गेला. त्या वेळी वऱ्हाडचा प्रदेश जुन्या मध्यप्रांत व वऱ्हाड (सी. पी. अँड बेरार प्रॉव्हिन्स) प्रांतात समाविष्ट होता. त्यात बहुसंख्या हिंदी भाषिकांची होती. वऱ्हाडातून येणारे उत्पन्न अधिकतर हिंदी विभागावर खर्च होऊनही वऱ्हाड दुर्लक्षिलेला राही. त्यामुळे त्यातून मराठी वऱ्हाड वेगळा करण्याची मागणी चालू शतकाच्या प्रारंभीपासून व्हाइसरॉयच्या कौन्सिलात होत होती. [[इ. स. १९३५]] साली प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा पास झाला.[[इ. स. १९३७]]च्या निवडणुकीत प्रांतिक विधिमंडळात काँग्रेसला बहुमत लाभले. विधिमंडळाचे सदस्य रामराव देशमुख यांनी १ ऑक्टोबर [[इ. स. १९३८]] रोजी त्या विधिमंडळापुढे मांडलेला वेगळ्या वऱ्हाडाचा ठराव एकमताने मंजूर झाला.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5857754.cms</ref>