"मराठी नाट्यसंगीत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Wikipedia python library v.2
छो (Wikipedia python library v.2)
गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव, [[राम मराठे|पं. राम मराठे]], [[जितेंद्र अभिषेकी|पं. जितेंद्र अभिषेकी]],[[छोटा गंधर्व]], केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. यातील प्रत्येक संगीतरचनाकार स्वतः उत्तम गायक होते. हिंदुस्थानभर भ्रमण करून संगीताचे ज्ञान आणि संस्कार त्यांनी आत्मसात केल्याने, त्याचे प्रतिबिंब नाट्यसंगीतात पडणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ ‘[[मानापमान (नाटक)|मानापमान]]’ नाटकातील अनेक चाली बनारस, लखनौ तसेच पंजाब येथील उपशास्त्रीय गायनप्रकारांवर बेतलेल्या आहेत. तसेच ‘[[स्वयंवर (नाटक)|स्वयंवर]]’ मधील अनेक पदे मूळ बंदिशींवर आधारली आहेत.
 
दरम्यान अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे मोठे कलाकारही मैफिलीत नाट्यसंगीताचा समावेश करू लागले. उस्ताद अब्दुल करीम खॉंखाँ, [[सवाई गंधर्व]], [[भीमसेन जोशी|पं. भीमसेन जोशी]], हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, पं. जितेंद्र अभिषेकी, [[छोटा गंधर्व]], पं. राम मराठे, विनायकबुवा पटवर्धन, मा. कृष्णराव, निवृत्तीबुवा सरनाईक, मा. दीनानाथ मंगेशकर, मालिनी राजूरकर अशी अनेक शास्त्रीय गायकांची नावे सांगता येतील. नाट्यसंगीत सर्व स्तरांत लोकप्रिय करण्याचे काम या कलाकारांनी केले.
 
==विविध सांगीतिक आकृतिबंध==
६३,६६५

संपादने