"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
छो Wikipedia python library v.2
ओळ ८२:
चेतापेशी अक्षरश: शेकडो प्रकारच्या अनुबंधाने परस्पराशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये शंभर एक प्रकारची चेताउद्भवी रसायने असतात. एकाहून अधिक प्रकार ग्राहकामध्ये असतात. अनेक अनुबंधामध्ये एकापेक्षा अधिक चेताउद्भवी रसायने असू शकतात. एका अशा प्रकारात एक चेताउद्भवी रसायन ग्लुटामेट किंवा जीएबीए (गॅमा अमिनो ब्युटारिक ॲ सिड) या वेगाने काम करणाऱ्या रसायनाबरोबर एक बहुअमिनो आम्ली पेप्टाइड चेताउद्भवी सावकाश कार्य करणारे रसायन अशी दोन्ही रसायने अनुबंधात असतात. चेताउद्भवी रसायनामध्ये सर्वसाधारण दोन भाग करता येतात. पहिला आयन गवाक्ष परिवाही आणि दुसरा संदेशक. आयन गवाक्ष परिवाही चेताउद्भवी रसायनामुळे ठरावीक प्रकारचे आयन पेशीपटलाच्या गवाक्षामधून पेशीमध्ये प्रवेशतात. आयनच्या प्रकारानुसार पेशी उद्दीपन किंवा शमन (एक्सायटेटरी आणि इन्हिबिटरी) होते . जेंव्हा संदेशक चेताउद्भवी रसायन परिणाम करते त्यावेळी अनेक गुंतागुंतीच्या प्रतिक्रिया होतात . या मुळे पेशीची संवेदनक्षमता कमी किंवा अधिक होते.
डेल या शास्त्रज्ञाने शोधून काढलेल्या नियमानुसार चेतापेशीकडून एकाच प्रकारचे चेताउद्भवी रसायन पेशी ज्या पेशीशी अनुबंधाने जोडलेल्या आहेत त्यामध्ये सोडण्यात येतात. ( या नियमास फार थोडे अपवाद आहेत). याचा अर्थ एका प्रकारच्या चेताउद्भवी रसायनामुळे एकच परिणाम असे नाही. त्याऐवजी ग्राहक पेशीवरील प्रकारानुसार अपेक्षित परिणाम होतो. त्यामुळे एका चेतापेशीचे उद्दीपन आणि दुसऱ्या पेशीचे शमन होऊ शकते. चेतापेशींच्या समुदायावर संस्करण (मोडयुलेशन) होणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया सुद्धा याच पद्धतीने होते. दोन चेताउद्भव रसायने ग्लुटामेट आणि जीएबीए यांचा परिणाम एकच पद्द्धतीचा होतो. ग्लुटामेट ग्राहक असलेल्या अनेक पेशी आहेत. पण बहुतेक पेशी ग्लुटामेट मुळे उद्दीपित होतात. त्याचप्रमाणे जीएबीए ग्राहक पेशीमध्ये शमन होते. या एकाच पद्धतीच्या परिणामामुळे ग्लुटामेट ग्राहक पेशी उद्दीपक चेतापेशी आणि जीए बीए ग्राहकपेशी शमनचेतापेशी असे म्हणण्याची पद्धत आहे. प्रत्यक्षात ही नावे चुकीचा अर्थ ध्वनित करतात. कारण चेतापेशी ऐवजी ग्राहक यंत्रणेवर पेशीचे उद्दीपन आणि शमन अवलंबून आहे. अगदी विद्वानानी लिहिलेल्या शोधा निबंधामधून सुद्धा आता हीच शब्द प्रणाली रूढ झाली आहे.
अनुबंधाच्या क्षमतेप्रमाणे अनुबंधातील स्मृति कप्पे तयार होणे ही अनुबंधातील एक महत्त्वाची बाब आहे. या प्रकारास दीर्घ कालीन संवेद (आवेग) “लॉंग“लाँग टर्म पोटेंशियल” - म्हणतात. ग्लुटामेट चेताउद्भव रसायन असणाऱ्या एका विशिष्ठ ग्राहकाच्या बाबतीत हा प्रकार नेहमी आढळतो. या विशिष्ठ ग्राहकास एनएमडीए (एन मिथिल डी अस्पार्टेट) असे म्हणतात. एनएमडीए ग्राहकामध्ये सहयोगी गुण आहे. अनुबंधामध्ये असलेल्या दोनही पेशी एकाच वेळी उत्तेजित झाल्या म्ह्णजे कॅलशियम आयन चॅनल उघडते आणि त्यातून कॅलशियम आयनांचा प्रवाह पेशीमध्ये येत राहतो. कॅलशियम आयनांच्या सान्निध्यात दुसरी मालिका चालू होते त्यामुळे ग्लुटामेट ग्राहक मोठ्यासंख्येने उघडून अनुबंधाची क्षमता वाढते. अनुबंधाची क्षमता वृद्धि काहीं आठवडे किंवा त्याहून अधिक काळ वाढलेली राहते. दीर्घकालीन संवेगाचा शोध 1973मध्ये लागला. त्यानंतर या पद्धतीचे आणखी काहीं दीर्घलाकीन संवेग ठावूक झाले आहेत. दीर्घलाकीन संवेग डोपामिन या चेताउद्भवी रसायन संबंधी सुद्धा सापडले आहेत. अनुबंधातील अशा बदलास अनुबंध लवचिकता (प्लॅस्टिसिटी) असे म्हणतात. परिस्थितीतील बदलाबरोबर चेतासंस्थेस जुळवीन घेणे अशामुळे शक्य झाले आहे. अनुबंध लवचिकता आणि स्मृति (अनुबंधची) या जवळच्य परस्पराशी संबंधित बाबी आहेत.