"युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[File:UK-2014-Oxford-All Souls College 03.jpg|इवलेसे|200px|आॅक्सफर्ड विद्यपीठ]]
'''ऑक्‍सफर्ड विद्यापीठ''' हे [[ब्रिटन]]मधील [[ऑक्‍सफर्ड शहर|ऑक्‍सफर्ड शहरात आहे]]. [[इंग्रजी]] बोलल्या जाणाऱ्या भागातील सर्वांत जुने विद्यापीठ असे त्याचे वर्णन केले जाते. अकराव्या शतकात त्याची स्थापना झाली; मात्र ते जास्त नावारूपाला आले बाराव्या शतकानंतर. [[इ.स. ११६७|११६७]] मध्ये [[पॅरिस]] विद्यापीठातून परदेशी शिक्षणतज्ज्ञांची हकालपट्टी करण्यात आली, त्यामुळे ते तज्ज्ञ ऑक्‍सफर्डमध्ये आले आणि हळूहळू तेथील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास सुरवात झाली. या विद्यापीठात स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वादंग झाल्यामुळे [[इ.स. १२०९|१२०९]] मध्ये काही शिक्षणतज्ज्ञ तेथून बाहेर पडले आणि त्यांनी [[केंब्रिज विद्यापीठ|केंब्रिज विद्यापीठाची]] स्थापना केली. ऑक्‍सफर्ड विद्यापीठाशी चाळीस स्वायत्त महाविद्यालये आणि संस्था निगडित आहेत. [[कुलगुरू]] या विद्यापीठाच्या कामकाजाचे प्रमुख असतात. [[कुलपति]]पदी एखाद्या क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते आणि ती आजन्म त्या पदावर कायम असते. ऑक्‍सफर्ड विद्यापीठीशी निगडित महाविद्यालये विशिष्ट विषयासाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, नफिल्ड महाविद्यालयात [[समाजशास्त्र]] हा विषय चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. ऑक्‍सफर्डमधील [[ग्रंथालय]] ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचे ग्रंथालय असून, त्यातील पुस्तके सलग लावली, तर त्यांची लांबी ११७ [[मैल]] होते.
 
[[वर्ग:इंग्लंडमधील विद्यापीठे]]