"सिचिल्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot v.2
ओळ १५:
'''सिचिल्या''' (देवनागरी लेखनभेद : '''सिसिली'''; [[इटालियन भाषा|इटालियन]]: ''Sicilia''; [[सिसिलियन भाषा|सिसिलियन]]: ''Sicilia'') हे [[भूमध्य समुद्र]]ामधील सर्वात मोठे [[बेट]] व [[इटली]] देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हे बेट [[इटालियन द्वीपकल्प]]ाच्या आग्नेय दिशेस स्थित असून [[मेसिनाची सामुद्रधुनी]] सिचिल्याला इटलीपासून अलग करते. सिचिल्याच्या पूर्व भागातील [[एटना]] हा [[युरोप]]ातील व जगातील सर्वात मोठ्या जागृत [[ज्वालामुखी]]ंपैकी येथील सर्वात ठळक खूण मानली जाते.
 
इ.स. पूर्व ८००० सालापासून वस्तीच्या खुणा आढललेल्या सिचिल्यावर इ.स. पूर्व ७५० पासून पुढील ६०० वर्षे [[ग्रीस|ग्रीकांचे]] अधिपत्य होते. त्यापुढील अनेक शतके [[रोमन प्रजासत्ताक]] व नंतर [[रोमन साम्राज्य]]ाची येथे सत्ता होती. रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर सिचिल्यावर [[व्हॅंडल्सव्हँडल्स]], [[बायझेंटाईन साम्राज्य|बायझेंटाईन]], [[खिलाफत]], [[नॉर्मन]] इत्यादी अनेक साम्राज्यांनी सत्ता गाजवली. इ.स. ११३० साली [[सिसिलीचे राजतंत्र|सिसिलीच्या राजतंत्राची]] स्थापना झाली. इ.स. १८१६ पर्यंत अस्तित्वात असलेले सिसिलीचे राजतंत्र [[आरागोन|आरागोनचे साम्राज्य]], [[स्पेन]], [[पवित्र रोमन साम्राज्य]] ह्या महासत्तांचे मांडलिक राज्य होते. इ.स. १८१६ साली [[नेपल्सचे राजतंत्र|नेपल्सच्या राजतंत्रासोबत]] सिसिलीने [[दोन सिसिलींचे राजतंत्र|दोन सिसिलींच्या राजतंत्राची]] निर्मिती केली. १८६१ साली [[इटलीचे एकत्रीकरण|इटलीच्या एकत्रीकरणानंतर]] सिसिली इटलीचा भाग बनला. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] झालेल्या संविधान बदलामध्ये सिचिल्याला स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला.
 
सिचिल्याला युरोपाच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष स्थान आहे. येथील कला, संगीत, वास्तूशास्त्र, भाषा इत्यादींमुळे सिचिल्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. [[माफिया]] ह्या गुंड टोळीचा उगम देखील येथेच झाला. आजच्या घडीला सिचिल्यामध्ये [[युनेस्को]]ची पाच [[जागतिक वारसा स्थान]]े आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिचिल्या" पासून हुडकले