"बाळाजी विश्वनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
ओळ १२७:
==='''थोरले माधवराव प्रशासनपर्व'''===
 
आपल्या स्वकीयांच्या आणि मुलाच्या मृत्युची बातमी ऎकुन नानासाहेब खचले. त्यांनी त्याची हाय खाल्ली हेच दु:ख उराशी कवटाळुन हा महान पेशवा २३ जुन १७६१ रोजी वारला. त्यांच्या धाकट्या मुलाने माधवराव पेशवा १ला याने मात्र पुढच्या काही वर्षात दक्षीणेत मराठी सत्तेचा दरारा परत प्रस्थापित केला. माधवरावास २० जुलै, १७६१ रोजी पेशवाईची वस्त्रे मिळाली. सुरुवातीच्या काळातच त्यांनी - १७६२ उरळी, नोव्हेंबर १७६२ घोडनदी, ऑगस्ट १७६३ राक्षसभुवन या लढाया केल्या. निजामाला १७५९ ला उदगीरला सदाशीवरावभाऊने निजामाला हरवुन ८५ लाखाचा मुलुख हस्तगत केला होता. त्याचा सुड घेण्यासाठी मराठयांच्या नाजुक परीस्थितीचा फायदा घेत नळदुर्ग, अक्कल्कोट या ठिकाणी निजामाने धुडगुस घालत होता. माधवरावांनी २० ऑगस्ट १७६१ रोजी मोहिम हाती घेतली. पण २९ डिसेंबर, सन १७६१ मध्ये राघोबादादांनी अनपेक्षीत तह केला. या नंतर पेशव्यांनी हैदरालीखान विरुद्ध मोहिम उघडली, मात्र रघुनाथरावांनी निजामाशी हातमिळवणी करून घरभेदीपणा केल्याने माधवरावांनी तात्पुरती शरणागती पत्करली. मात्र निजाम व राघोबादादा यांच्यात बेबनाव सुरू झाला निजामाने पुण्यावर हल्ले केले. या नंतर औरंगाबादवर मराठ्यांनी हल्ले केले. पुढे राक्षसभुवन येथे १० ऑगस्ट १७६३ च्या युद्धात पेशव्यांनी निजामाचा दारुण पराभव केला. निजामाकडून उदगीरचे ६० लाख आणि नविन २२ लाख असा एकुण ८२ लाखांचा मुलुख मरठ्यांनी मिळवला. माधवरावाने हैद्राबादच्या निजामाला दाती तृण धरायला लावले. या नंतरच्या काळात माधवरावांनी कर्नाटकवर एकंदर ५ स्वाऱ्या केल्या. या मोहिमांमुळे अगदी शहाजीराजांच्या वेळचा जहागिरीचा सर्व मुलुख परत मराठ्यांना मिळाला. या मोहिमांत माधवरावाचे शिस्त, चिकाटी, शौर्य, जरब हे गुण हे गुण उजळुन निघाले. १२ वर्षांत त्याने मराठी सत्तेचा गेलेला आत्मविश्वास परत मिळवुन दिला. मराठ्यांचा ब्रिटीश इतिहासकार ग्रॅंडग्रँड डफ हा माधवराव पेशव्याची तुलना त्याचाच आजा पहिला बाजीराव याच्या बरोबर करतो. राघोबादादाने मात्र माधवरावाच्या पेशवा बनण्याला विरोध केला. राघोबादादाला पेशवेपद त्याच्याकडे पाहिजे होते. म्हणजे शाहुराजे - ताराराणी मधला जुना वादच परत या दोघात चालु झाला. शेवटी नाईलाजाने माधवरावांनी राघोबादादांना नजरकैदेत टाकले. पुढे आतड्याच्या क्षयाच्या आजाराने माधवरावांचे १७ नोव्हेंबर १७७२ रोजी थेउर येथे गणपती मंदीराच्या ओसरीतच निधन झाले. ग्रॅंडग्रँड डफ म्हणातो - '''"पानिपतापेक्षाही माधवरावाचा मृत्यु हा पेशवाईसाठी दुस्वप्न ठरला."''' माधवराव गोरेपान, उंचपुरे, आणि थोराड शरीराचे होते, काळेभोर आणि पाणीदार डोळे, उग्र चेहेरा याच बरोबर मितभाषी असून एरवी बोलताना रोखठोक आणि ठासुन बोलत. लेखन रेखिव होते. राज्याच्या कर्जफेडीसाठी स्वतःचे लाखो रुपये, जडजवाहिर दिले. बाजीरावाप्रमाणेच माधवरावांना देखिल चैन, आळस, लबाडि बिलकुल खपत नसे.
 
==='''पेशवाईचे पुनरुत्थान'''===