"क्लोद मोने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎संदर्भ: वेबॅक आर्किव्ह
छो Wikipedia python library v.2
ओळ २७:
 
== जीवन ==
[[पॅरिस|पॅरिसमध्ये]] जन्म झालेल्या मोनेचे बालपण 'ल आव्र (Le Havre) ' या [[नोर्मांडी|नोर्मांडीतील]] बंदराच्या गावी गेले. मोनेचे वडील पेशाने वाणी होते; तर आई गायिका होती. बालपणी वडिलांच्या दुकानात येणाऱ्या गिर्‍हाईकांची, ओळखीतल्या लोकांची रेखाटने काढणाऱ्या मोनेला सुदैवाने [[युजेन बूदँ]] याचे मार्गदर्शन लाभले. आपल्या मुलाने आपला घरचा धंदा सांभाळावा अशी मोनेच्या वडिलांची इच्छा होती; परंतु बुदॅंच्याबुदँच्या प्रयत्नांमुळे क्लोद मोनेला कलाशिक्षणाकरता अखेरीस पॅरीसला पाठविण्यात आले.
 
जून [[इ.स. १८६१|१८६१]] मध्ये क्लोद मोने [[अल्जीरिया|अल्जीरियातील]] फ्रेंच लष्कराच्या 'आफ्रिकन लाईट कॅव्हॅलरी'च्या पहिल्या रेजिमेंटमध्ये दाखल झाला. परंतु काही काळानंतर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे लष्करी सेवेला रामराम ठोकून, तो पुन्हा पॅरीसमध्ये परतून 'आतलिए ग्लेएर' या शिक्षणसंस्थेत दाखल झाला. तेथे त्याचा [[पिएर रन्वार]], [[फ्रेडेरिक बाझीय|फ्रेडरिक बाझीय]], [[आल्फ्रेड सिस्ले]] या त्याच्यासारख्याच प्रयोगशील चित्रकारांबरोबर संबंध आला. खुल्या हवेत चित्रण करण्याच्या कल्पनांची, तुकड्या-तुकड्यांत जलदगतीने दिलेल्या ब्रशाच्या फटकाऱ्यांतून साकारलेल्या रंगलेपनातून ऊन-सावल्यांचा परिणाम साधण्यासारख्या प्रयोगांची त्यांच्यात देवाणघेवाण होत असे; ज्यातून पुढच्या काळातील 'दृक् प्रत्ययवाद चित्रशैली'ची बीजे पेरली गेली.