"सिकलसेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 40 langlinks, now provided by Wikidata on d:Q185034
छो Wikipedia python library v.2
ओळ ११:
 
''''''सिकल पेशी आजारमुळे उद्भवणारे विकार.''''''
सिकल पेशी आजारामुळे होणारी नेहमीची गुंतागुंत म्हणजे रक्तक्षय ‘अॅ‘ॲ निमिया’. याचा परिणाम रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येणे, प्लीहा या अवयवामध्ये रक्तपेशींचे विघटन होते. सिकल पेशी आजारात प्लीहेवर अति ताण पडल्याने प्लीहा मोठी होते. रक्तविघटनामध्ये अडथळे निर्माण होतात.
केशवाहिन्यामधून सिकल पेशी सुरळीतपणे वाहून नेल्या जात नसल्याने रक्त अवरोध निर्माण होतो. याच्या परिणामाने वेदना, आणि रक्तप्रवाह अवरोधामुळे उतीनाश होतो. वेदनाशामके घेतल्यानंतर किरकोळ तक्रारी दूर होतात. तीव्र वेदना थांबवण्यासाठी ओपियम (अफू) वर्गीय औषधांचा वापर करावा लागतो. फुफ्फुसे आणि शिस्नामधील रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आल्यास तातडीचे उपचार करावे लागतात.
 
ओळ २४:
सिकलपेशी आजार जनुकामधील उत्परिवर्तनामुळे होतो. हीमोग्लोबिन रेणू दोन बहुपेप्टाइडनी बनलेला असतो. अल्फा आणि बीटा. बीटा हीमोग्लोबिन बहुपेप्टाइड मधील सहाव्या क्रमांकाच्या जलस्नेही (हायड्रोफिलिक) ग्लुटामिक अमिनो आम्लाची जागा व्हॅलिन या जलद्वेषी (हायड्रोफोबिक) अमिनो आम्लाने घेतली जाते. बीटा ग्लोबिन बनविणारे जनुक 11व्या गुणसूत्रावर असते. सामान्य हीमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी दोन अल्फा आणि दोन बीटा हीमोग्लोबिन बहुपेप्टाइडची आवश्यकता असते. केवळ सहाव्या अमिनो आम्लाच्या बदलामुळे परिसरात ऑक्सिजनचे प्रमाणकमी असल्यास हीमोग्लोबिन रेणूचा आकार बदलून तो दात्र (सिकल) आकाराचा –विळ्यासारखा होतो. यामुळे पेशीचा आकार विळ्यासारखा होऊन पेशीची स्थितिस्थापकता कमी होते.
सिकलसेल आजारातील प्रमुख विकार रक्तपेशीमधील स्थितिस्थापकता बदलण्याशी संबंधित आहे. सामान्य रक्तपेशी लवचिक असल्याने सूक्ष्मरक्तवाहिन्यामधून सहज आकार बदलून वाहून नेली जाते. सिकलसेल आजारामध्ये ऑक्सिजन कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होतो. समुद्रसपाटीपासून अधिक उंचावर असा परिणाम त्वरित होतो. ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य झाल्यानंतर या पेशींचा विळ्यासारखा आकार पूर्ववत होत नाही. परिणामी सूक्ष्म रक्तवाहिन्या अधिक अरुंद होऊन सिकल पेशींच्या अडथळ्यामुळे उतीना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नाही. या प्रकारास वैद्यकीय परिभाषेत ‘इश्चेमिया’ म्हणतात.
रक्तपेशींच्या कमतरतेस ‘पंडुरोग’ अॅमनिमियाॲमनिमिया म्हणतात. रक्तपेशींचे मोठ्याप्रमाणात विघटन झाले म्हणजे पंडुरोग होतो. आकार बदललेल्या पेशी प्लीहेमध्ये नष्ट केल्या जातात. अस्थिमज्जेमध्ये नव्या रक्तपेशी सतत तयार होत असतात. सामान्य रक्तपेशीचे आयुष्य120 दिवसांचे असते. पण सिकल पेशी फक्त 10-20 दिवसच रक्तप्रवाहामध्ये राहू शकत असल्याने अस्थिमज्जेमधील नव्या पेशी त्यांची जागा घेऊ न शकल्याने रक्तपेशींची कमतरता होऊन पंडुरोग होतो.
मानवी रक्तपेशीमध्ये हीमोग्लोबिन ‘ए’ असते. हीमोग्लोबिन ए मध्ये दोन अल्फा आणि दोन बीटा बहुपेप्टाइड असतात. हीमोग्लोबिनचा आणखी एक प्रकार ए2 मध्ये दोन अल्फा आणि दोन डेल्टा बहुपेप्टाइड असतात. हीमोग्लोबिन एफ दोन अल्फा आणि दोन गॅमा बहुपेप्टाइडनी बनलेले असते. 96-97 % रक्तपेशीमध्ये हीमोग्लोबिन ए असते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सिकलसेल" पासून हुडकले