"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|अगस्त्य किंवा अगस्ती नांवाचे हिंदू पुराणांतील ऋषी|अगस्ती (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:WLA lacma 12th century Maharishi Agastya.jpg|thumb|right|200px|अगस्त्याचेअगस्त्य महर्षींचे शिल्प]]
 
'''अगस्त्य महर्षी''' (नामभेद: '''अगस्त्य''', '''मैत्रावरुणी''', '''अगस्ति''';) हे वेद वाङ्‌मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. [[सप्तर्षी|सप्तर्षींपैकी]] मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य [[वसिष्ठ]] ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारात भगवान अगस्तींचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. ‘अगस्त्य’ हे भगवान [[शिव|परमशिवांचे]]देखील एक नांव असल्याने अगस्ती मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. ‘अगस्त्य’ ह्या नांवाव्यतिरिक्त त्यांस तमिऴमुनी, माधवमुनी, महामुनी, कुरुमुनी, तिरुमुनी, बोधीमुनी, अमरमुनी, कुडमुनी, कुंभज, कुंभसंभव, घटोद्भव ही नामाभिधाने प्राप्त आहेत. अशा अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (३००० इ.स.पूर्व) ला काशीमध्ये झाला. मित्रावरुण हे त्यांचे पिता होत. [[ऋग्वेद|ऋग्वेदामध्ये]] (संदर्भ: ७/३३/१३) त्यांच्या जन्मकथेचे वर्णन येते. वर्तमानकाळांत [[काशी|काशीक्षेत्रातील]] त्यांचे जन्मस्थान श्रीअगस्त्यकुंड ह्या नांवाने प्रसिद्ध आहे.
ओळ २६:
 
== विविध स्थळे ==
[[चित्र:Agasti.jpg|250px|इवलेसे|उजवे|[[अकोले]] येथील अगस्ती ऋषींची मुर्तीमूर्ती]]
भारतवर्षात तसेच इतरत्रदेखील, अगस्त्यकूट, अगस्त्यपुरम, अगस्त्यतीर्थ, अगस्त्यगिरी, अगस्त्यवटम्, अगस्त्यसरस्स्, अगस्त्याश्रम, अगस्तीश्वरम ह्यासारखी ह्या महर्षींच्या नांवाने आरंभ होणारी विविध स्थळांची नांवे ही त्यांच्या चतुरस्र चरित्ररेखेची साक्ष देणारी ठरावीत. महर्षींचे भारतवर्षामध्ये अनेक आश्रम आहेत. त्यातील काही मुख्य आश्रम उत्तराखंड (रुद्रप्रयाग जिल्हा, अगस्त्यमुनी शहर), महाराष्ट्र (अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात प्रवरानदीच्या काठावर), आंध्रप्रदेश (तिरुपती), तमिऴनाडू (चेन्‍नईजवळ अगस्त्यकूट पर्वतावर) ह्या ठिकाणी आहेत. त्यांसह [[इंडोनेशिया]], [[जावा]], [[सुमात्रा]] इत्यादी ठिकाणीही ह्यांचे पूजन केले जाते. आकाशाच्या ईशान्य कोपर्‍यात उगवणारा तारा कॅनोपस (Canopus) हा पौरस्त्य ज्योतिषशास्त्रात ‘अगस्तीचा तारा’ म्हणून गणला जातो, हा भगवान श्री अगस्त्य महर्षींच्या व्यक्तिरेखेचा गौरवच आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले