"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संपादनासाठी शोध संहीता वापरली
ओळ ६:
या केंद्रामध्ये १९९५पासून पदव्युत्तर पातळीवर सर्टिफिकेट कोर्स, २००२पासून [[पदविका अभ्यासक्रम]] आणि २००९पासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. '''क्रांतिज्योती स्त्री-अभ्यास केंद्र''' पुणे विद्यापीठाच्या आवारात असून, आपल्या नवनिर्मितीसाठी व सर्वोत्तमतेसाठी प्रसिद्ध आहे. पुणे शहरास स्त्री-प्रश्नाच्या राजकीय जाणिवेचा प्रदीर्घ वारसा आहे. [[महात्मा फ़ुले]] आणि [[सावित्रीबाई फ़ुले]] यांनी मुलींसाठीची पहिली शाळा ह्याच शहरात १८४८ला सुरू केली. सावित्रीबाई फ़ुले ह्या आधुनिक भारतातील प्रथम स्त्री-शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. तेव्हापासून [[विधवा पुनर्विवाह|विधवा पुनर्विवाहाचा]] प्रश्न असो किंवा शिक्षणासंदर्भातील वादविवाद असो, [[पुणे]] शहर हे कायमच केंद्रस्थानी राहिलेले आहे. पंडिता रमाबाईंचे शारदासदन, [[महर्षी कर्वे]] यांच्या शिक्षणसंस्था ह्या सर्वांचे मूलस्थान हे पुणे शहरच आहे. पुणे शहरातील त्यांच्या वास्तव्यातून खूप काही घेण्यासारखे असून, त्यामुळे '''क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रा'''ला विविध शक्यतांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यही आले आहे.
 
भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या साहाय्याने अशी एकूण ६०136 स्त्री-अभ्यास केंद्रे कार्यरत आहेत. [http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/academic.htm पुणे विद्यापीठ संकेतस्थळ]
 
==संशोधन==
[[महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील स्त्रियांची कामे]], [[महाराष्ट्रातील दलित आणि भटक्या-विमुक्त समाजातील स्त्रियांचे प्रश्न]], [[महाराष्ट्राचा जात- वर्ण- लिंगभेद संदर्भातील सामाजिक इतिहास]] (१८५० - १९५०) हे विषय केंद्राने संशोधनासाठी निश्चित केले आहेत.