"शिक्षक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १९:
==मनोरंजन क्षेत्रातील शिक्षकांच्या भूमीका==
सर्वच भाषेतील मनोरंजन क्षेत्रातील साहित्य, नाटक, टिव्ही सिरीयल्स चित्रपट इत्यादी माध्यमातून शिक्षकांच्या भूमिका विवीध साहित्यिक, कलावंत आणि दिग्दर्शकांनी वेळोवेळी साकारल्या आहेत. शिक्षकांच्या भूमीकात प्राधान्याने तीन प्रकार दाखवले जातात एक 'गुरू' ही भूमीका यात मुख्यत्वे संगीत, क्रिडा इत्यादी प्रकार येत असावेत, दुसरे शिक्षकाच्या व्यक्तीगत जीवनाशी संबंधीत भाग, तिसरे शाळा अथवा महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवतानाच्या भूमिका साकारलेल्या दिसतात.
 
 
१९४३ साली पु.ल. देशपांडे यांनी ’अभिरुची’ च्या एका अंकात ‘[[अण्णा वडगावकर]]’ हे शिक्षकाचे व्यक्तिचित्र लिहिले ते पुढे व्यक्ती आणि वल्ली या ग्रंथात समाविष्ट केले गेले. व्यक्ती आणि वल्ली याच ग्रंथात पु.ल. देशपांडे चितळे मास्तर ही भूमीकाही रेखाटली आहे. बिगरी ते मेट्रिक मध्ये दामले मास्तर हि भूमिका रेखाटली आहे.<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4939172774478469311?BookName=Vyakti-Ani-Valli</ref> <ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref>
 
 
<ref>http://www.misalpav.com/comment/609758#comment-609758</ref>
 
 
 
 
मराठी चित्रपटात श्रीराम लागू यांनी पिंजरा आणि सामना या चित्रपटातून शिक्षकांची भूमिका साकारली आहे. पिंजरा चित्रपतात आदर्श आणि व्यक्तीगत जीवनाच्या उत्तरार्धात भरकटलेले, पण समाज मनात आदर्शाच महत्व अधोरेखीत करणारे शिक्षक अशी भूमीका श्रीराम लागू यांनी सादर केली आहे. सामना या चित्रपटात त्यांचा मास्तर असा उल्लेख होतो परंतु त्यांना शिकवताना दाखवलेले नाही. स्मीता पाटील यांनी उंबरठा चित्रपटातून वसतीगृहाच्या वॉर्डनची भूमीका साकारली आहे. दिलीप प्रभावळकर एक डाव भुताचा चित्रपटात भूमिका साकारली आहे. अतुल कुलकर्णी यांनी दहावी फ या चित्रपटात भूमीका साकारली आहे. 'खो खो' या मराठी चित्रपटात भरत जाधव यांनी श्रीरंग देशमुख नावाच्या शिक्षकाची भूमीका उभी केली आहे.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शिक्षक" पासून हुडकले