"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १९१९ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
ओळ ३:
 
== प्रकाशित साहित्य ==
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबर्‍या लिहिणार्‍या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. ''धूर्तविलसत'', ''मारून मुटकून वैद्यबुवा'' व ''जबरीचा विवाह'' ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, ''जयध्वज'' (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), ''श्रुतकीर्तचरित'' (कॉग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राइड’) व ''सुमतिविजय'' ([[शेक्सपियर|शेक्सपियरचे]] ’मेझर फॉर मेझर’) ही [[रूपांतरित नाटके]] आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबर्‍यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. ''बिचारा'' या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या [[केसरी (वृत्तपत्र)|केसरीच्या]] अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होतीहोत.
 
{| class="wikitable sortable"