"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  ५ वर्षांपूर्वी
संपादनासाठी शोध संहीता वापरली
छो (मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)
(संपादनासाठी शोध संहीता वापरली)
| वेब = [http://www.amsterdam.nl/ amsterdam.nl]
}}
'''अ‍ॅम्स्टरडॅम''' ({{lang-nl|Amsterdam}}; {{ध्वनी-मदतीविना|Nl-Amsterdam.ogg|उच्चार}}) ही [[नेदरलँड्स]] देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नेदरलँड्सच्या पश्चिम भागात [[नूर्द-हॉलंड]] ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅम्स्टरडॅम शहर [[उत्तर समुद्र]]ासोबत एका २५ किमी लांब कृत्रिम [[कालवा|कालव्याद्वारे]] जोडले गेले आहे. २०१० सालच्या अखेरीस अ‍ॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.iamsterdam.com/en/visiting/touristinformation/aboutamsterdam/factsandfigures |शीर्षक=Facts and Figures {{मृत दुवा}}|publisher=I amsterdam |accessdate=1 June 2011}}</ref>
 
१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. आजच्या घडीला नेदरलँड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅम्स्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.citymayors.com/features/quality_survey.html |शीर्षक=Best cities in the world (Mercer) |publisher=City Mayors |date=26 May 2010 |accessdate=10 October 2010}}</ref> येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅम्स्टरडॅमचे नाव [[युनेस्को]]च्या [[जागतिक वारसा स्थान]]ांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
२९,७८८

संपादने