"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६२:
१. इराकच्या बरबादीचा पाया ब्रिटिशांच्या वसाहतकालात घातला गेला. ब्रिटिशांनी इराक दीर्घकाल आपल्या ताब्यात ठेवले, आणि त्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर पुरेपूर डल्ला मारला. इराकच्या अर्थव्यवस्थेशी स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था निगडित केली, स्वतःच्या देशाला समृद्ध केले आणि इराकची वाताहत केली. हेच दुष्कृत्य इंग्रजांनी हिंदुस्थानात केले होते.
 
. इराक हा अमेरिकेचा एकेकाळचा दोस्त होता. अमेरिका आणि इराणमध्ये सन १९७९मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर शत्रुत्व आले आणि ते जपण्यासाठी अमेरिकेला इराकची मदत होत असे. इराण आणि इराकमध्ये इसवी सन १९८० पासून ते १९८८पर्यंत आखाती युद्ध झाले, त्यावेळी अमेरिका इराकच्या बरोबर होता आणि सद्दाम हुसेनची मदत घेत होता. त्या काळात ब्रिटनही इराकच्या बरोबर असे. पण जेव्हा इराकने कुवेत ताब्यात घेण्यासाठी त्या देशावर स्वारी केली, तेव्हा ब्रिटन आणि अमेरिका दोघेही इराकला शत्रू मानू लागले. या दोन्ही देशांनी इतर काही देशांच्या बरोबरीने इराकी सैन्याशी युद्ध करून त्यांना कुवेतमधून बाहेर हकलले. इराकमध्ये जनसंहारक रासायनिक शस्त्रे आहेत असा अमेरिका आणि ब्रिटन यांना संशय होता. केवळ या संशयावरून अमेरिकेने इराकवर इसवी सन २००३मध्ये हल्ला केला आणि इराकला नेस्तनाबूत केले. अमेरिकन सैन्य इराकमध्ये बरीच वर्षे राहिले आणि त्यामुळे तेथे आतंकवाद बळावला. स्त्रियांची परिस्थिती बिघडत गेली. त्यांच्यामधले शिक्षणाचे प्रमाण ७५ टक्क्यांनी खालावले, आणि ते आणखी कमी कमी होत राहिले. इराकमध्ये कोणतीही संहारक शस्त्रे सापडली नाहीतच, पण सद्दाम हुसेनला मात्र अमेरिकनांनी पकडून ठार मारले.
 
३. खुद्द सद्दाम हुसेन हे देशाला एकसंघ ठेवण्यात कमी पडले. त्यांना इराकला सुन्नी मुसलमानांचे राज्य बनवावयाचे होते, म्हणून त्यासाठी त्यांची देशात हुकूमशाही चाले. परिणामी इराकमधले शिया मुसलमान आणि कुर्द जमातीचे सुन्नी मुसलमान सद्दामच्या विरोधात गेले. सद्दाम हुसेन आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये कधीही समजूतदारपणा दाखवत नसत. कुर्दांना तर स्वतःचे कुर्दिस्तान हवे होते. सद्दामनंतर आलेल्या शिया सरकारनेही सुन्नी मुसलमान जनतेकडे दुर्लक्ष केले, आणि परिस्थिती आणखीनच बिघडत गेली.
"https://mr.wikipedia.org/wiki/इराक" पासून हुडकले