"इराक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
छो
इ‌.स. १९२१मध्ये मक्का येथील शरीफ हुसेन बीन अलीच्या, फैजल नावाच्या पुत्राला इराकचा पहिला राजा म्हणून घोषित केले गेले. त्यानंतर दीर्घकाल चाललेल्या हिंसक लढायांनंतर इ‌‌.स. १९३२मध्ये इराक स्वतंत्र झाला. त्यानंतरही ब्रिटनने दुसऱ्या जागतिक महायुद्धात परत इराकवर विजय मिळवून त्याला पारतंत्र्यात ढकलले. शेवटी इसवी सन १९५८मध्ये ब्रिटिशांची सत्ता झुगारून इराक स्वतंत्र झाला.
 
===इराकची समृदधसमृद्ध संस्कृती===
असाही एक काळ होता, की जेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफांचे केंद्र होते. तेव्हा इराकमधील शहरे खूपच समृद्ध आणि आधुनिक असून उर्वरित जगाने आदर्श मानली होती. येथूनच जगभर व्यापार आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. अब्बासी खलिफांचा सर्व भर शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांवर होता. याचा साऱ्या अरब जगतावर चांगला परिणाम होत होता. या मध्ययुगात जेव्हा इराक हे ज्ञानाचे केंद्र होते, तेव्हा युरोपात फक्त मालक आणि गुलाम असत. तेथे लोकांना विविध प्रकारचे भरमसाठ कर द्यावे लागत. याउलट इराक हे अरब जगताचे केंद्र होते, आणि येथे कानाकोपऱ्यात विकासाचे वारे होते.
 
५५,२५१

संपादने