"मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ७:
* आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या [[थायरॉइड]] ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही [[ग्रंथी]] सुजते, त्याला [[गलगंड]] असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे वाढीवर विपरीत परिणाम होतो.<ref>http://www.loksatta.com/navneet-news/iodised-salt-786541/</ref>
== इतिहास ==
प्राचीन काळापासून् हे मानवाला ज्ञात आहे. सर्वात प्राचीन लिखित उल्लेख [[वेद|वेदात आढळून येतो.<ref>http://books.google.com.au/books?id=2TpMnMHqDWIC&pg=PT95&lpg=PT95&dq=salt+in+vedas&source=bl&ots=6H-BkXlhxL&sig=lECD5ClPbSCEX-1FEkCbK25DWew&hl=en&sa=X&ei=-JzyU_OGFcaiugSR-YHQBg&ved=0CEwQ6AEwBg#v=onepage&q=salt%20in%20vedas&f=false</ref> [[छांदोग्य उपनिषद]] यात मिठाचा उल्लेख आहे.<ref>http://www.thenagain.info/Classes/Sources/Upanishads.html</ref> [[ग्रीक साहित्य|ग्रीक साहित्यात]] [[होमर]] या कवीने याचा उल्लेख केलेला आढळतो.<ref>http://books.google.com.au/books?id=YbT64n3wYhoC&printsec=frontcover&dq=Salt:+A+World+History&hl=en&sa=X&ei=OZvyU7DpMtSGuASVpYHgBg&ved=0CCYQ6AEwAA#v=onepage&q=Salt%3A%20A%20World%20History&f=false</ref> [[गांधीजी|गांधीजींनी]] [[मिठाचा सत्याग्रह]] करून [[इंग्लंड]]च्या सत्तेला आव्हान दिले होते.<ref>http://www.saltworks.us/salt_info/si_HistoryOfSalt.asp</ref>
 
==मानवी आरोग्यावर परिणाम==
अल्प प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास आवश्यक असते, मात्र अति प्रमाणातील मीठ प्राणिजीवनास तसेच [[वनस्पती]]जीवनास हानिकारक असते.<ref>http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87-109040700060_1.htm</ref> हा [[क्षार]] शरिराच्या सर्व भागात आढळतो. शरिरातील [[पचन|चयापचयासाठी]] व वितरणासाठी हा आवश्यक घटक आहे. जठरातील रस व [[पित्त]] बनवण्यास मदत करतो या क्षारामुळे शरिरातील [[आम्ल]] संतुलित राहते व [[मज्जारज्जू]] व मासपेशींचे कार्य व्यवस्थित चालते. शरिरातील या क्षाराचे प्रमाण कमी झाल्यास [[अशक्तपणा]] येतो, [[त्वचा]] ढिली पडते, पोटऱ्यामध्ये गोळे येतात. वजन कमी होते, डोळे खोल जातात, मानसिक दुर्बलता जाणवते, हदयाच्या कार्यात फरक पडतो. याउलट अधिक खाल्यामुळे पित्त वाढते, [[रक्त|रक्ताच्या]] गतीमध्ये वाढ होते, तहान लागते, मूर्च्छा येते, [[हाडे]] कमकुवत होतात, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, [[केस]] पांढरे होतात, [[मुत्रपिंड|मुत्रपिंडाचे]] कार्य वाढते [[हात]], [[पाय]], [[चेहरा]] व [[पोट]] यावर [[सूज]] येते. मीठाचे प्रमाण [[आहार|आहारात]] [[चव|चवी]] पुरतेच असावे.
"https://mr.wikipedia.org/wiki/मीठ" पासून हुडकले