'''हरियाणा (Haryana)''' हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे [[क्षेत्रफळ]] ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची [[लोकसंख्या]] २,५३,५३,०८१ एवढी आहे. [[हिंदी]] ही हरियाणाची प्रमुख [[भाषा]] आहे. [[चंदीगड]] ही हरियाणा व [[पंजाब]] या दोन राज्यांची संयुक्त [[राजधानी]] आहे. हरियाणाची [[साक्षरता]] ७६.६४ टक्के आहे. [[गहू]], [[ज्वारी]], [[जव]], [[ऊस]] ही येथील प्रमुख [[पिके]] आहेत. [[महाभारत]] काळात [[कौरव]] व [[पांडव]] यांच्यात हरियाणा येथील [[कुरूक्षेत्र]] या ठिकाणी भीषण [[युद्ध]] झाले होते.