"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४७:
=== सर्वंकषसत्तावाद ===
फॅसिझम सर्वंकषसत्तावादी राज्याच्या स्थापनेचे समर्थन करतो. ''डॉक्ट्रीन ऑफ फॅसिझम'' ह्या दस्तावेजात सांगितल्याप्रमाणे "फॅसिस्टांची राज्याबद्दलची संकल्पना सर्वसमावेशक असते; त्याबाहेर कोणत्याही मानवी किंवा आध्यात्मिक मूल्याचे अस्तित्व असू शकत नाही, (त्याला मूल्य असणे तर दूरच). अशाप्रकारे, फॅसिझम हा सर्वंकषसत्तावादी आहे, आणि फॅसिस्ट राज्य - एक कृत्रिम रचना आणि सर्व मूल्यांना सामावून घेणारी एक संस्था - जनतेच्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ लावते, त्याचा विकास घडवते आणि त्याला समर्थ बनवते." ''द लीगल बेसिस ऑफ द टोटल स्टेट'' ह्या दस्तावेजात नाझी राजकीय तत्त्वज्ञ कार्ल श्मिट्ट ह्याने "जर्मन लोकांना एकमेकांपासून तोडणार्‍या प्रलयकारी विविधतेला" टाळण्यासाठी "सर्व प्रकारच्या विविधतेच्या पलीकडे जाऊन राजकीय एकतेच्या संपूर्णतेची हमी देणार्‍या एका बळकट राज्याची" निर्मिती करण्याच्या नाझी मनसुब्याचे वर्णन केले आहे.
फॅसिस्ट राज्ये समाजावर त्यांची तत्त्वे बिंबवण्यासाठी शिक्षणातून आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्रचारतंत्र चालवत असत व ह्यासाठी ते शैक्षणिक साहित्य आणि प्रसारमाध्यमांचे नियंत्रण करत. फॅसिस्ट चळवळीचे उदात्तीकरण करण्यासाठी व राष्ट्रासाठी त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम विशिष्टप्रकारे निर्माण केला जात असे. फॅसिस्ट चळवळीच्या विचारांशी अनुरूप नसलेल्या इतर सर्व विचारांचे दमन करणे व विद्यार्थ्यांना राज्याप्रती आज्ञाधारक बनण्यास शिकवणे असा त्याचा उद्देश होता.
फॅसिझम उदारमतवादी लोकशाहीचा विरोध करतो. तो बहुपक्षीय व्यवस्थेला नकारून एकपक्षीय राज्याचे समर्थन करतो. तरीसुद्धा, त्याने लोकशाहीच्या एका रूपाचे समर्थक असल्याचा दावा केला होता.
 
=== अर्थव्यवस्था ===
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले