"अमेरिकेची संयुक्त संस्थाने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ६९:
 
== प्रशासकीय संरचना ==
अमेरिकची राज्य संस्था ही फेडरेशन (इंग्लिश: federation) स्वरूपाची आहे. राज्यविभागणीची ही पद्धत भारतीय राज्यविभागणीपेक्षा मूलत: वेगळी आहे. भारतीय राज्ये ही स्वातंत्र्योत्तर एकसंध देशाची भाषावार प्रशासकीय उद्देशाने रचना करण्यासाठी आखणी करून अस्तित्वात आली. ह्याउलट, अमेरिकन रा़ज्ये ही मूलत: वेगवेगळ्या वसाहती होत्या व ह्या वसाहतींनी एकत्र येऊन नवीन इंग्लंडहून स्वतंत्र होऊन सार्वभौम देश स्थापन केला. १७७६ सालच्या मूळ अमेरिकन स्वतंत्रेच्या वेळीस १३ वसाहतींनी राज्य म्हणून स्वघोषणा करून संयुक्त संस्थानांची स्थापना केली. इतर बहुतांश राज्ये ही १८व्या व १९व्या शतकात मूळ संघास येऊन मिळाली. अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला गेला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला.
 
 
 
=== राष्ट्राध्यक्ष ===
५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिका) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यात विभागित केलेली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (काँग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रीप्रेझेंटेटिव्हस्' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रीप्रेझेंटेटिव्हस'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.