"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
'''फॅसिझम''' किंवा '''फॅसिस्टवाद''' किंवा '''फासीवाद''' हे मूलगामी [[हुकुमशाही|अधिकारशाही]] [[राष्ट्रवाद|राष्ट्रवादाचे]] एक स्वरूप आहे, जे २०व्या शतकाच्या सुरुवातीस [[मध्य युरोप|मध्य-युरोपात]] ठळकपणे दिसू लागले. फॅसिझमच्या समर्थकांना किंवा फॅसिझमनुसार राज्यकारभार चालवणाऱ्यांना "''फॅसिस्ट''" म्हटले जाते. [[राष्ट्रीय सिंडिकेटवाद|राष्ट्रीय सिंडिकेटवादाने]] प्रभावित झालेल्या सुरुवातीच्या फॅसिस्ट चळवळी [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाच्या]] दरम्यान [[इटली]]मध्ये उदयास आल्या. फॅसिझममध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा [[उजवी विचारसरणी|उजव्या विचारसरणीच्या]] भूमिकेचा आणि [[डावी विचारसरणी|डाव्या विचारसरणीच्या]] राजकारणाचा संगम करण्यात आला होता. फॅसिझमचे हे वैशिष्ट्य [[साम्यवादउदारमतवाद]], [[समाजवाद]], उदारमतवादी [[लोकशाहीमार्क्सवाद]] आणि पारंपारिक [[पुराणमतवाद]] ह्यांच्या विरुद्ध आहे. डाव्या-उजव्या विचारधारांच्या पारंपारिक मोजपट्टीवर फॅसिझमला सहसा कट्टर उजव्या बाजूचे मानले जाते. पण काही समिक्षकांनी आणि स्वतः फॅसिस्टांनी फॅसिझमची अशी मांडणी पुरेशी नसल्याचे सांगत त्यावर आक्षेप घेतला आहे.
 
राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून एका [[हुकुमशाही|सर्वंकषसत्तावादी]] राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका अशा पक्षाची निर्मिती जो फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनर्स्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल. जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रति भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि [[लष्करसत्तावाद|लष्करसत्तावादावर]] विशेष जोर. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि [[साम्राज्यवाद]] ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत. फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले