"भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मुबईतील भायखळा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ मिनिटांच्या अंतरावरील राणीचा बाग आहे. त्याच्या प्रवेशद्वारीच डावीकडे हे भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय (जुने नाव राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट म्युझियम) आहे. या इमारतीचें बांधकाम इटालियन रेनेसान्स शैलीचें असून त्यात भव्यतेबरोबर कलात्मकताही जाणवते.
 
इतिहास, भूगोल, साहित्य, लोकजीवन, कलाकृती यांची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या हेतूने हे वस्तुसंग्रहालय उभे राहिले आहे. मुंबईतील पहिले व कोलकाता, चेन्नईनंतर तिसरा क्रमांक या वस्तुसंग्रहालयाला आहे. मुंबई इलाख्याच्या अखत्यारीतीतील गव्हर्न्मेंटगव्हर्नमेन्ट सेंट्रल इकॉनॉमिक म्युझियम असे त्याचे नाव प्रारंभी नाव होते. कालांतराने मुंबई महापालिका आणि नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट्सआर्ट्‌स अ‍ॅण्डअ‍ॅन्ड कल्चरल हेरिटेज यांच्यात अखेरीस करार होऊन वारसा वास्तुसंवर्धन मार्गदर्शक तत्त्व प्रणालीनुसारतत्त्वप्रणालीनुसार इमारत आणि परिसराची पुनर्रचना करण्यात आली.
 
राणी व्हिक्टोरियाला 'एम्प्रेस ऑफ इंडिया' हा किताब बहाल केल्याप्रीत्यर्थ सरकारने दिलेली देणगी आणि लोकवर्गणीतून ही इमारत पूर्ण झाली. कलाप्रेमी नागरिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने वस्तुसंग्रहालयाचे कामकाज चालू शकते, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे ही संस्था आहे. या इमारतीच्या बांधणीसाठी ४,३०,०००/- रुपये खर्च आला, त्यातील १,१०,०००/- रु. लोकांच्या वर्गणीतून दिले गेले तर उर्वरित रक्कम सरकारने उपलब्ध करून दिली.