"सोनू निगम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Reverted 1 edit by 117.203.119.91 (talk) identified as vandalism to last revision by EmausBot. (TW)
ओळ ३०:
=== कारकिर्द ===
सोनू निगम साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आपल्या वडिलांसमवेत सभारंभात तसेच लग्न सोहळ्यात गायचा. बालपणात त्याने बऱ्याच गायन स्पर्धांतही यशस्वी भाग घेतला. वयाच्या साधारण १९ व्या वर्षी तो आपल्या वडिलांबरोबर मुंबईत आला. <br /> त्याचे मुंबईतले सुरुवातीचे वास्तव्य धडपडीचे होते. टी- सिरीज कंपनीचे मालक यांनी त्याला संधी दिली. पण त्यातही त्याला मोहम्मद रफीचीच गाणी गाण्यासाठी मिळाली. त्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत आपला आवाज पोहचवूनही त्याच्यावर बऱ्याच जणांनी तो रफीची नक्कल करीत असल्याचा शिक्का मारला. १९९० मध्ये त्याने जानम चित्रपटासाठी पहिले गाणे गायले, पण काही कारणास्तव तो चित्रपट बंद पडला. दरम्यान, त्याने आकाशवाणीवरच्या जाहिरातींना आवाज दिला. अर्थात झी वाहिनीच्या सा रे गा मा कार्यक्रमाने त्याला ओळख दिली मग त्याने मागे वळून पाहिले नाही. मग बेवफा सनम चित्रपटातले त्याचे 'अच्छा सिला दिया तूने' हे गाणे तुफान गाजले आणि पार्शवगायक म्हणून स्थिरावण्याची संधी त्याला मिळाली.
सोनू ने सारेगामात सूत्रधाराची भूमिका घेतल्यापासून त्याला अधिकाधिक गाणी मिळू लागली. १९९७ च्या बॉर्डर चित्रपटातले "संदेसे आते है" हे त्याचे गाणे सुपरहिट झाले. त्यानंतर त्याच वर्षी प्रदेसपरदेस चित्रपटातले ''ये दिल दिवाना'' हे गाणे त्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यात आणि रफीच्या नकलेचा शिक्का पुसण्यास कामी आले. त्यानंतर त्याची स्वतंत्र शैली सर्वांनीसर्वांनीच मान्य केली. तसेच रोल मॉडेल म्हणूनही तो गणला जाऊ लागला. <br /> गाण्यात भावना व्यक्त करणे, आवाजांचा पोत बदलणे यामुळे त्याला महान गायकांच्या श्रेणीत बसायला फार वेळ लागला नाही. हिंदीप्रमाणेच त्याने बंगाली, उडिया, कानडी, पंजाबी, तामीळ, तेलुगू, इंग्रजी, भोजपुरी, ऊर्दू, नेपाळी, मराठी या भाषांतही गाणी म्हटली आहेत.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनू_निगम" पासून हुडकले