"दादोबा पांडुरंग तर्खडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
चरित्राचा काही भाग आणि मराठी व्याकरणाची माहिती
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
{{विस्तार}}
'''दादोबा पांडुरंग तर्खडकर''' (तथा '''दादोबा पांडुरंग''') ([[९ मे]], [[इ.स. १८१४|१८१४]] - [[१७ ऑक्टोबर]], [[इ.स. १८८२|१८८२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] [[व्याकरण|व्याकरणकार]], [[लेखक|लेखक]] आणि [[समाजसुधारक|समाजसुधारक]] म्हणून प्रसिद्ध होते. तसेच ते [[मानवधर्मसभा|मानवधर्मसभा]] आणि [[परमहंससभा|परमहंससभा]] ह्या समाजसुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे संस्थापक सदस्य होते. त्यांचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते.
 
==कौटुंबिक माहिती==
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे [[ठाणे|ठाणे]] जिल्ह्यातील [[वसई|वसई]] तालुक्यातील [[तरखड|तरखड]] ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते. दादोबांचा जन्म मुंबईत शेतवळी अर्थात [[खेतवाडी|खेतवाडी]] येथे झाला. त्यांच्या इतर भावंडांपैकी [[भास्कर पांडुरंग तर्खडकर| भास्कर पांडुरंग तर्खडकर]] आणि [[आत्माराम पांडुरंग तर्खडकर|आत्माराम पांडुरंग तर्खडकर]] हेही आपापल्या क्षेत्रात प्रसिद्धकार्यरत होते.
 
==शिक्षण==
दादोबांचे प्राथमिक शिक्षण काही काळ पंतोजींच्या शाळांत झाले. ह्या काळातच त्यांनी आपल्या मित्रांच्या साहाय्याने [[फारशी|फारशी]] आणि [[संस्कृत|संस्कृत]] ह्या भाषांचे प्राथमिक ज्ञान संपादन केले. १८२५ मध्ये त्यांना [[मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळी|मुंबईच्या हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळीच्या]] (म्हणजेच दि बॉम्बे नेटिव स्कूल अॅण्ड स्कूलबुक सोसायटीच्या) शाळेत घालण्यात आले. पुढे ह्या शाळेचे नामांतर [[एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट|एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट]] असे करण्यात आले. १८३५ साली दादोबा त्याच शाळेत "असिस्टण्ट टीचर" ह्या पदावर कामाला लागले.
==मराठी व्याकरण==
 
१८३३मध्ये शाळेत असताना आपणही मराठीचे व्याकरण लिहावे अशी दादोबांना इच्छा झाली. त्यांनी तसे एक व्याकरण प्रश्नोत्तर-स्वरूपात लिहूनही काढले. परंतु त्यांना स्वतःलाच ते न आवडल्याने लिंडली मर्फी ह्याच्या इंग्लिश व्याकरणाच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण नव्याने लिहून काढले. ह्या व्याकरणाची पहिली आवृत्ती १८३६ साली [[गणपत कृष्णाजी|गणपत कृष्णाजीच्या]] छापखान्यात छापून [[महाराष्ट्र भाषेचे व्याकरण|महाराष्ट्र भाषेचे व्याकरण]] ह्या नावाने स्वतः दादोबांनीच प्रकाशित केली. <ref>प्रियोळकर, अनंत काकबा (१९४७). ''रावबहादूर दादोबा पांडुरंग : आत्मचरित्र व चरित्र'', पृ. २८९-३०८. [[केशव भिकाजी ढवळे]], [[मुंबई]]. </ref>
१८५० साली शिक्षणविभागाकरता ह्या व्याकरणाची दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळाखात्याकरता असल्याने [[मेजर थोमस कॅण्डी|मेजर थोमस कॅण्डी]], [[कृष्णशास्त्री चिपळूणकर|कृष्णशास्त्री चिपळूणकर]] ह्यांसारख्या शिक्षणविभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचे कसून परीक्षण करण्यात आले. ही आवृत्ती [[अमेरिकन मिशन प्रेस|अमेरिकन मिशन प्रेसच्या]] छापखान्यात छापून प्रकाशित करण्यात आली.
१८६५ साली दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती [[मराठी लघु व्याकरण|मराठी लघु व्याकरण]] ह्या नावाने प्रकाशित केली. हे पुस्तक पुढे बराच काळ शालेय शिक्षणात प्रचलित होते. १८८२पर्यंत ह्या लघु व्याकरणाच्या १२ आव़ृत्त्या प्रकाशित झाल्या. १९४४पर्यंत ह्या ग्रंथांच्या सुमारे १ लाख प्रती प्रकाशित झाल्या.
दादोबांच्या मृत्यूपर्यंत [[महाराष्ट्र भाषेचे व्याकरण|महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़]] ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी [[मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका|मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका]] हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.
== प्रकाशित साहित्य ==
{| class="wikitable sortable"
Line १६ ⟶ २०:
! width="20%"| प्रकाशन वर्ष (इ.स.)
|-
| [[महाराष्ट्र भाषेचे व्याकरण]] |व्याकरण| |दादोबा पांडुरंग तर्खडकर| |१८३६|
| [[]] || || ||
|-
|}
 
==संदर्भ आणि नोंदी==
 
 
{{मराठी साहित्यिक}}