"फॅसिझम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विकिकरण केले
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ३:
राष्ट्रीय एकीकरणासाठी समाजात मोठ्या प्रमाणात उठाव घडवून आणून<ref name="gj120" /><ref name="encyclopedia" /> एका [[हुकुमशाही|सर्वंकषसत्तावादी]] राज्याची निर्मिती करणे ही फॅसिस्टांची भूमिका होती. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका अशा पक्षाची निर्मिती जो फॅसिस्ट विचारधारेच्या तत्त्वांनुसार देशाला पुनर्स्थापित करण्यासाठी क्रांतिकारक राजकीय चळवळ उभारेल.<ref name="eatwell" /> जगभरातील फॅसिस्ट चळवळींमध्ये काही समान दुवे आहेत - राष्ट्राचे उदात्तीकरण, शक्तिशाली नेत्याप्रति भक्ती आणि समर्पण, तसेच अतिराष्ट्रवाद आणि [[लष्करसत्तावाद|लष्करसत्तावादावर]] विशेष जोर. फॅसिझमच्या धोरणानुसार राजकीय हिंसा, युद्ध आणि [[साम्राज्यवाद]] ही राष्ट्रीय आनंद पुनर्जागृत करण्याची साधने आहेत.<ref name="gj120"/><ref name="routledge" /><ref name="Stanley G. Payne 1945. p. 106">Stanley G. Payne. A History of Fascism, 1914–1945. p. 106.</ref><ref>Jackson J. Spielvogel. ''Western Civilization''. Wadsworth, Cengage Learning, 2012. p. 935.</ref> फॅसिझमचे स्पष्ट प्रतिपादन आहे की शक्तिशाली देशांना स्वतःचे साम्राज्य विस्तारण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ह्यासाठी स्वतःपेक्षा कमजोर देशांना विस्थापित करण्याचा पण त्यांना पूर्ण अधिकार आहे.<ref>Cyprian P. Blamires. World Fascism: A Historical Encyclopedia, Volume 2. Santa Barbara, California, USA: ABC-CLIO, 2006. p. 331.</ref>
 
फॅसिस्ट विचारधारा पुनःपुन्हा राज्याच्या श्रेष्ठत्वाचा पुनरोच्चार करते. [[इटली]] येथील [[बेनितो मुसोलिनी]] आणि [[जर्मनी]] येथील [[अ‍ॅडॉल्फ हिटलर]] ह्यांनी स्वतःला राज्याचे मूर्तीमंत रूप म्हणून प्रस्तुत केले व त्याआधारे स्वतःच्या निर्विवाद निरंकुष सत्तेचा दावा केला. फॅसिझमचे सिद्धांत, संकल्पना आणि संज्ञा हे [[समाजसत्तावाद|समाजसत्तावादाकडून]] उधार घेतलेले आहेत. मात्र समाजसत्तावादाच्या केंद्रस्थानी [[वर्गसंघर्ष|वर्गसंघर्षाचा]] मुद्दा होता, तर फॅसिझमने त्याला बदलवून त्याजागी परराष्ट्रसंघर्ष आणि [[वंशवाद]] ह्यांना स्वतःचा आधार बनवले.<ref name="Griffin, Roger 1991 pp. 222-223"/> फॅसिस्ट लोक [[मिश्र अर्थव्यवस्था|मिश्र अर्थव्यवस्थेचे]] समर्थन करतात, ज्याचा मुख्य उद्देश हा असेल की स्वदेशी उत्पादनाला देशाच्या बाजारपेठेत संरक्षण देऊन व आर्थिक धोरणांमध्ये हस्तक्षेप करून राष्ट्रीय स्वयंपूर्णता साधवी.<ref name="Blamires, Cyprian 2006 p. 188-189" />
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] काही पक्षांनी स्वतः फॅसिस्ट असल्याचे जाहीरपणे घोषित केले आहे. पण "फॅसिस्ट" ही संज्ञा सहसा राजकीय विरोधकांद्वारे तिरस्कारव्यंजका म्हणून वापरली जाते. २०व्या शतकातील फॅसिस्ट चळवळींमधून पुढे उदयास आलेल्या विचारधारांना किंवा तत्सम कट्टर उजव्या विचारधारांना अधिक औपचारिकपणे संबोधण्यासाठी "नव-फॅसिस्ट" (neo-fascist) किंवा "उत्तर-फॅसिस्ट" (post-fascist) ही संज्ञा वापरली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/फॅसिझम" पासून हुडकले