"मॅक्झिम गॉर्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४७:
[[अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन]]च्या म्हणण्यानुसार गॉर्कीच्या सोवियत संघात परतण्याची कारणे भौतिक होती. इटलीमध्ये [[सोरेंटो]] येथे गॉर्कीला ना पैसा ना मान अशा परिस्थितीमध्ये रहावे लागत होते. [[इ.स. १९२९|१९२९]] नंतर त्याने सोवियत संघाच्या अनेक वाऱ्या केल्या. [[इ.स. १९२९|१९२९]] मध्ये त्याने [[सोलोव्स्की]] बेटावरील [[श्रमतुरुंग|श्रमतुरुंगास]] भेट दिली व श्रमतुरुंगांच्या पद्धतीबद्दल स्तुतीपर लेख लिहिला. एव्हाना श्रमतुरुंगांच्या पद्धतीस पाश्चिमात्य देशांमध्ये अगोदरच वाईट नाव मिळाले होते. अखेर [[इ.स. १९३२|१९३२]]मध्ये [[जोसेफ स्टालिन|जोसेफ स्टालिनने]] गॉर्कीला स्वतः सोवियत संघात परतण्याचे निमंत्रण दिले.
 
[[फासीवादफॅसिझम|फासीवादीफॅसिस्ट]] इटलीमधून गॉर्कीचे परतणे ही सोवियत संघाच्या दृष्टीने प्रचाराची मोठीच संधी होती. त्याला "ऑर्डर ऑफ लेनिन" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला राहण्यास घरे देण्यात आली व मॉस्कोमधील एका रस्त्यास त्याचे नाव देण्यात आले.
 
पुढे स्टालिनच्या अत्याचारांमध्ये झालेली वाढ व [[डिसेंबर महिना|डिसेंबर]] [[इ.स. १९३४|१९३४]] मधील [[सर्जेई किरोव्ह]] याची हत्या या पार्श्वभुमीवर गॉर्कीला त्याच्या घरी नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. त्याला [[प्रावदा]] वर्तमानपत्राची खास आवृत्ती देण्यात येत असे ज्यामध्ये अटक व राजकीय हत्या यांच्या बातम्या गाळलेल्या असत.
 
[[इ.स. १९३५|१९३५]] च्या मे महिन्यामध्ये गॉर्कीचा मुलगा मॅक्सिम पेश्कोव्ह याचा अचानक मृत्यु झाला. यानंतर जून [[इ.स. १९३६|१९३६]] मध्ये गॉर्कीदेखील मरण पावला. दोघांचेही मृत्यु संशयास्पद परिस्थितीमध्ये झाले पण त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे अंदाज कधीच सिद्ध होउ शकले नाहीत. गॉर्कीची शवपेटी स्वतः स्टालिन व [[मोलोटोव्ह]] यांनी वाहून नेली.
 
== साहित्य ==
मॅक्झिम गोर्की हे एक कामगारवर्गिय लेखक होते. त्यांच्या निष्क्रीय व भांडवलदारांच्या बाजूने उभ्या असलेल्या लेखकांना व कलाकारांना आपल्या लेखांमधून "संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कोणाबरोबर आहात?" असा खडा सवाल विचारला. रशियन समाजवादी क्रांतीचा इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे साहित्य म्हणजे उत्तम दस्तावेज आहेत. त्यांच्या साहित्यिक निर्मिती खालीलप्रमाणे आहेत
 
* "निबंध आणि लघुकथा" (कथासंग्रह)
* "फोमा गोर्देयेव" (कादंबरी)
* "तिघे" (कादंबरी)
* "वादळी पक्षाचे गाणे" (कविता)
* "छोटी माणसे" (नाटक)
* "आणखी खोल पाताळात" (नाटक)
* "[[आई (कादंबरी)|आई]]" (कादंबरी)
* "संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कोणाबरोबर आहात?" (लेखसंग्रह)
 
[[वर्ग:रशियन लेखक|गॉर्की, मॅक्झिम]]
[[वर्ग:इ.स. १८६८ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील मृत्यू]]
 
[[ml:മാക്സിം ഗോര്‍ക്കി]]