"संगीत रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
’संगीत रत्‍नाकरा’त शारंगदेवाने संगीताच्या महासागरात खोलवर जाऊन संगीताच्या अत्यंत व्यापक आणि विशाल क्षेत्राचा परिचय करून दिला आहे. त्यासाठी त्याने त्याच्या काळात आणि त्याच्याही अगोदर होऊन गेलेल्या सुमारे ४० पूर्वाचार्यांच्या मतांचे सार काढले आहे..
 
या चार-खंडी ’संगीत रत्‍नाकरा’त एकूण सात प्रकरणे आहेत. संस्कृतमधील संगीतावर लिहिल्या गेलेला संस्कृतमधील हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. या ग्रंथावर सर्वात जास्त टीका लिहिल्या गेल्या आहेत, आणि आजवर कुठल्याही संगीतावरील ग्रंथाच्या नसतील तेवढ्या आवृत्त्या या ग्रंथाच्या निघाल्या आहेत.
 
या ग्रंथावर काशीपती कविराज, कलानिधी (इ.स. १४३०), कल्लिनाथ (इ.स. १४३०), गंगाधर, सिंहभूपाल (इ.स. १३३०-1330 ई) वगैरे विद्वानांनी टीका लिहिल्या आहेत. सिंहभूपाल यांनी लिहिलेल्या टीकाग्रंथाचे नाव 'संगीतसुधाकर' असे आहे.
 
जगांतल्या अनेक भाषांत ’संगीत रत्‍नाकर’ या ग्रंथाचे सर्वाधिक अनुवाद प्रकाशित झाले आहेत.