"किराणा घराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
==इतिहास==
इसवी सनाच्या १३च्या शतकात महाराष्ट्रातील औरंगाबादजवळच्या देवगिरी शहरात यादवांचे राज्य होते. त्यावेळी रामदेवराव यादव यांच्या दरबारात [[गोपाल नायक]] नावाचे एक ध्रुपद गाणारे गायक होते. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने जेव्हा देवगिरी जिंकले तेव्हा त्याने देवगिरीच्या दरबारातील अनेक संगीततज्ज्ञांना पळवून दिल्लीला नेले. त्यांपैकी गोपाळ नायकअसलेले एक होते. हे [[गोपाळ नायक]], म्हणजे हे किराणा घराण्याचे आद्य संस्थापक.
 
त्यांचे शिष्य भन्नू नायक आणि धोंडू नायक. घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे गायक ग़ुलाम अली और ग़ुलाम मौला हे होते, तर चौथ्या पिढीत आले उस्ताद बंदे अली खान.. किराणा घराण्याचे प्रवर्तक समजले जाणारे उस्ताद अब्दुल करीम खान हे [[गोपाळ नायक]] यांनी निर्माण केलेल्या संगीत परंपरेतील पाचव्या पिढीवे गायक.
 
उस्ताद अब्दुल करीम खान, हे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरजवळच्या शामली जिल्ह्यातील कैराना नावाच्या गावाचे रहिवासी होते. त्यावरून या घराण्याचे नाव कैराना पडले. मात्र, पुढे हे घराणे ’किराणा’ (हिंदीत किराना) या नावाने प्रसिद्धीस आले.