"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎मराठवाड्यातील साहित्यिक: उत्पात मजकूर हटविला
No edit summary
ओळ ७८:
औरंगाबादचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, [[नांदेड]]चे [[श्री गुरुगोविंदसिंहजी अभियांत्रिकी महाविद्यालय]] आणि इतर अनेक स्वायत्त शिक्षणसंस्था मराठवाड्यात आहेत.
 
====[[मराठवाडा विद्यापीठ]], बदलेले नाव : [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]====
डॉ.[[भीमराव रामजी आंबेडकर|बाबासाहेब आंबेडकर]] यांनी वेरूळ -अजिंठ्यालगतच औरंगाबाद परिसरात एक मोठे शिक्षण, ज्ञानकेंद्र उभारण्याची योजना आखली होती. प्रामुख्याने आधुनिक शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजातील बहुसंख्यकांसाठी हे नियोजन होते. औरंगाबाद शहराजवळच्या भागाचे नागसेन वन असे नामकरण करून तेथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना त्यांनी केली. याच परिसरात स्वातंत्र्यानंतर मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. या विद्यापीठाचे उद्‌घाटन भारताचे पहिले पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू]] यांच्या हस्ते २३ऑगस्ट १९५८ ला करण्यात आले.<ref name="UNI">[http://www.bamu.net/history.htm डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा] इतिहास.</ref> सुरुवातीला मराठवाडा विद्यापीठ एवढेच नाव असलेल्या या विद्यापीठाचा नामविस्तार पुढे महाराष्ट्र शासनाने [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]] असा केला. प्रदेशातील औरंगाबाद, [[जालना]], [[बीड]] आणि [[उस्मानाबाद]] या चार जिल्ह्यांतील महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[उस्मानाबाद]] येथे या विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
 
ओळ ८४:
[[नांदेड]] येथे मुख्यालय असलेल्या या [[विद्यापीठ अनुदान आयोग]] (यूजीसी) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापना १७ सप्टेंबर १९९४ रोजी झाली. निजामाच्या राजवटीतून विभाग मुक्त करण्यासाठी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत चाललेल्या लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे.<ref name="SRT">[http://srtmun.ac.in/Aboutsrtmun.aspx स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे] संकेतस्थळ.</ref> प्रदेशातील [[नांदेड]], [[हिंगोली]], [[परभणी]] आणि [[लातूर]] या चार जिल्ह्यांतली महाविद्यालये हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. [[लातूर]] येथे विद्यापीठाचे उपकेंद्र आहे.
 
====[[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] बदलेले नाव : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ ====
१९५६ मध्ये राज्य पुनर्रचनेच्या काही काळ आधी तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या परभणी येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. त्याचाच पुढे विस्तार करून १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना परभणीत करण्यात आली.<ref>http://mkv2.mah.nic.in/doe/maufrgen.html {{मृत दुवा}}</ref> २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे करण्यात आले. मराठवाड्याचे आठही जिल्हे हे या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे. कृषी, शेतीशी संबंधित शास्त्रे आणि मानव्यविद्येचे शिक्षण देणे हे या विद्यापीठाचे प्रमुख कार्य आहे. त्याचप्रमाणे कृषी विषयांचे संशोधनही येथे होते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मराठवाडा" पासून हुडकले