"भारत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ ५३:
''मुख्य लेख [[भारतीय इतिहास]]''
 
भारत देश हा मानवी इतिहासातील प्राचीन देशांमध्ये गणला जातो. मध्यप्रदेशातील भीमबेटका येथील पाषाणयुगातील भित्तीचित्रे भारतातील मानवी अस्तित्वाचे सर्वांत जुने पुरावे आहेत. पुराणतज्ञांनुसार, सत्तर हजार वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश केला. साधारणपणे ९००० वर्षांपूर्वी भारतात ग्राम व शहरी स्वरूपांची मानवी वस्ती होऊ लागली व त्याचेच हळूहळू [[सिंधू संस्कृती|सिंधू संस्कृती]] संस्कृतीत रुपांतर झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = Introduction to the Ancient Indus Valley |दुवा=http://www.harappa.com/indus/indus1.html
|ॲक्सेसदिनांक = 2007-06-18 |वर्ष= 1996 |प्रकाशक = Harappa}}</ref>. इसवीसन पूर्व ३५०० च्या सुमारास [[सिंधू संस्कृती|सिंधू संस्कृतीचा]] काल मानला जातो. या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली. [[मोहेंजोदडो]] व [[हडप्पा|हरप्पा]] ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरी भारतीय इतिहासातच गणली जातात. यानंतरचा काळ (इ.स. पूर्व १५०० ते इ.स. पूर्व ५००) वैदिक काळ म्हणून गणला जातो. काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य अशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व वैदीक काळ सूरू झाला<ref>डिस्कवरी ऑफ इंडिया-ले. पंडित जवाहरलाल नेहरु</ref>. परंतु सध्या संशोधकांचे असे मत आहे की वैदीक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदीक संस्कृती व हडाप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदीक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्या काठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील [[सरस्वती नदी]] ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन [[सरस्वती नदी]] ही [[पंजाब]], [[राजस्थान]] व [[कच्छ जिल्हा|कच्छ]] [[गुजरात]] मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. या वैदीक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदीक काळात सिंधू काठची वैदीक संस्कृती गंगेच्या खोर्यात पसरली.
 
[[चित्र:Indischer Maler des 6. Jahrhunderts 001.jpg|thumb|left|[[अजिंठा-वेरूळची लेणी]] येथील भित्तीचित्रे]]
 
इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थित्यंतरे झालीत. भारताच्या मुद्देसूद इतिहासाची येथपासून सुरुवात होते. [[चंद्रगुप्त मौर्य|चंद्रगुप्त मौर्याने]] मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली ज्याचा [[सम्राट अशोक|सम्राट अशोकाने]] कळस गाठला. कलिंगाच्या युद्धात मानवी क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग अवलंबला व [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]] स्वीकार केला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |शीर्षक = Maurya dynasty |दुवा = http://www.livius.org/man-md/mauryas/mauryas.html |लेखक = Jona Lendering |ॲक्सेसदिनांक = 2007-06-17}}</ref> भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली. काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता. तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्याने]] भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले. हा काळ भारताचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळातच जनतेवर दीर्घकाल राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या वैदीक धर्माची वेगळ्या स्वरुपात पुनर्बांधणी झाली. [[साहित्य]], [[गणित]], [[शास्त्र]], [[तत्त्वज्ञान]] इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली."<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://knowindia.gov.in/knowindia/culture_heritage.php?id=15|शीर्षक=Gupta period has been described as the Golden Age of Indian history|ॲक्सेसदिनांक=०२ फेब्रुवारी २०१४ |}}</ref>
 
भारत या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता. दक्षिण भारतात अनेक साम्राज्ये उदयास आली. [[तमिळनाडू|तमिळनाडूतील]] [[चोल साम्राज्य]], [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरचे साम्राज्य]], [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[सातवाहन]], या काळातील कला, स्थापत्यशास्त्रातील प्रगती आजही खूणावते. [[अजिंठा-वेरूळची लेणी]], [[वेरुळ]], [[हंपी|हंपीचे]] प्राचीन नगर, दक्षिणेतील प्राचीन मंदीरे ही याच काळात बांधली गेली [[चोल साम्राज्य|चोल साम्राज्याचा]] विस्तार [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] [[इंडोनेशिया]] या देशापर्यंत पोहोचला होता.
 
११ व्या शतकात [[इराण|इराणमधील]] [[मोहम्मद बिन कासीम]] ने सिंध प्रांतात आक्रमण केले व ते काबीज केले. यानंतर अनेक इस्लामी आक्रमणे आली व भारतातील मोठ्या भूभागावर [[इस्लामी राजवट]] लागू झाली. भारतातील अनेक राज्ये आर्थिक दृष्ट्या अतिशय पुढारलेली होती. इस्लामी आक्रमणात, सत्ता काबीज करणे तसेच लूट करणे हे मुख्य उद्देश्य असत. [[गझनी]] येथील एका राज्यकर्त्याने भारतात लूटीच्या १७ मोहिमा आखल्या होत्या. [[तैमूरलंग|तैमूरलंगने]] केलेले [[दिल्लीतील शिरकाण(तैमूरलंग)|दिल्लीतील शिरकाण]] ही मानवी इतिहासातील सर्वाधिक क्रूर घटना होती असे [[इतिहासकार]] नमूद करतात दिल्ली सल्तनत ते मोघलांपर्यंत अनेक इस्लामी राज्ये उदयास आली. यातील [[मुघल साम्राज्य|मुघल राजवट]] सर्वाधिक विस्ताराचे होते. मुघल राजवटीत [[शिवाजी महाराज|शिवाजी महाराजांनी]] [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याची]] स्थापना केली,ज्याचा मुख्य उदेश्य भारतात एतद्देशीयांचे राज्य पुर्न‍‍स्थापन करणे हा होता. मराठा साम्राज्याच्या विस्ताराबरोबरच मुघल साम्राज्य क्षीण होत गेले. पानिपतच्या युद्धात दारुण पराभवानंतर मराठ्याचे पतन सुरू झाले ज्याचा सर्वाधिक फायदा युरोपीयन साम्राज्यवाद्यांना झाला. सोळाव्या शतकापासूनच अनेक युरोपीय देशांनी व्यापाराचे निमित्त करून भारतात वसाहती स्थापल्या होत्या व आपले साम्राज्यवादी धोरण ते पुढे रेटत होते. [[इंग्लिश लोक]], [[पोर्तुगीज]], [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]], [[डच]] हे भारतात आपले वर्चस्व गाजवण्यास धडपडत होते. इंग्रजांनी साहजिकच आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्धकौशल्य तसेच [[मुत्सदेगीरी]], फुटीचे राजकारण करून हळूहळू भारतातील सर्व राज्ये आपल्या अधिपत्याखाली आणली. [[बंगाल]]पासून सुरुवात करत, [[म्हैसूर]]चा [[टिपू सुलतान]], १८१८ मध्ये [[मराठा साम्राज्य]], १८५० च्या सुमारास पंजाबमधील शिख व जाट असे हस्तगत करत जवळपास संपूर्ण भारताला इंग्रजांनी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] च्या कारभाराखाली घेतले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://india.gov.in/knowindia/history_freedom_struggle.php|शीर्षक=History : Indian Freedom Struggle (1857-1947)|ॲक्सेसदिनांक=2007-10-03 |प्रकाशक= [[National Informatics Centre|National Informatics Centre (NIC)]] |अवतरण=And by 1856, the British conquest and its authority were firmly established.}}</ref>. १८५७ मध्ये ब्रिटीश सेनेमधील भारतीय सैनिकांनी उठाव केला व पहाता पहाता संपूर्ण भारतभर त्याचे पडसाद उमटले. ब्रिटीशांविरुद्धचा उठाव अयशस्वी झाला तरी ब्रिटीशांविरुद्ध स्वातंत्र मिळवण्याची उर्मी भारतीयांच्यात जागृत झाली. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनी कडून कारभार ब्रिटीश सरकार कडे गेला.
"https://mr.wikipedia.org/wiki/भारत" पासून हुडकले