"अहमदशाह अब्दाली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:इ.स. १७७२ मधील मृत्यू टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Portrait miniature of Ahmad Shah Durrani.jpg|thumb|right|अहमदशाह अब्दाली]]
'''अहमदशाह दुराणी''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: حمد شاه درانی ;) ऊर्फ '''अहमदशाह अब्दाली''' ([[पश्तो भाषा|पश्तो]]:, [[फारसी भाषा|फारसी]]: احمد شاه ابدالي ;) ,जन्मनावाने '''अहमदखान अब्दाली''', ([[इ.स. १७२२]] - [[इ.स. १७७३१७७२]]) हा [[दुराणी साम्राज्य|दुर्राणी साम्राज्याचा]] [[अफगाणिस्तान|अफगाण]] संस्थापक होता. आधुनिक काळातील [[अफगाणिस्तान]] देशाच्या गाभ्याची बांधणी त्याने स्थापलेल्या साम्राज्यातून झाल्यामुळे तो अफगाणिस्तानाचा जनक मानला जातो.
 
अहमदखान आपल्या तरुणपणी अफशरी साम्राज्याच्या सैन्यात सैनिक म्हणून दाखल झाला व दाखविलेल्या शौर्यामुळे लवकरच चार हजार अब्दाली पठाणांचा प्रमुख बनला. [[इराण|इराणाचा]] अफशरी सम्राट [[नादीरशाह|नादीरशाह अफशर]] याचा जून [[इ.स. १७४७]] साली मृत्यू झाल्यानंतर अहमदशाह अब्दाली [[खोरासान|खोरासानाचा]] अमीर बनला. आपल्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या पठाण टोळ्यांना एकवटून त्याने पूर्वेकडे भारतीय उपखंडातल्या [[मोगल साम्राज्य|मोगल साम्राज्यास]] व पश्चिमेकडे खिळखिळ्या झालेल्या इराणातल्या अफशरी साम्राज्याला मागे रेटत आपले राज्य विस्तारले. त्याने दोन-तीन वर्षांच्या आतच वर्तमान काळातील अफगाणिस्तान, [[पाकिस्तान]], ईशान्य [[इराण]] व भारतीय उपखंडातील [[पंजाब]] प्रदेशात आपली सत्ता विस्तारली.