"महाराजबाग (नागपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख नागपूरची महाराजबाग वरुन महाराजबाग, नागपूर ला हलविला
No edit summary
ओळ २:
सुमारे १५ एकर परीसरात पसरलेली '''नागपूरची महाराजबाग''' ही सुमारे १२० वर्ष जुनी आहे. बाग तसेच प्राणीसंग्रहालय असे तिचे स्वरुप आहे.[[इ.स. १८९५]] साली 'पंजाबराव कृषी विद्यापिठाची' स्थापना झाल्यावर त्या निमित्ताने येथे अनेक दुर्मिळ वनस्पती लावण्यात आल्या.[[मॅहोगनी]], [[गोरखचिंच]], [[कळंब वृक्ष|कदंब]] [[अंकोल|काळा अंकोल]], [[नागलिंगम]], [[रक्तचंदन]], [[शिरणी]], [[कुसुम]] इत्यादी वनस्पती येथे उपलब्ध आहेत.येथे शेजारीच आंबेवाडी आहे. तेथे नागीण जातीचे आंब्याचे वृक्ष आहेत.[[चिकु]] [[फणस]] इत्यादी नेहमी दिसणारे वृक्षही येथे आहेत.
 
वनस्पतींनी हिरव्या परीसरामुळे, येथे सकाळच्या वेळी अनेक पक्षी बघावयास मिळतात.[[वटवट्या]], [[शिंजीर]], [[तांबट]], [[सातभाई]], [[दयाळ (पक्षी)|दयाळ]], [[सुतार]], [[हळद्या]], [[निलकंठ (पक्षी)|निलकंठ]], [[टाकचोर]], [[खंड्या]],[[कोतवाल (पक्षी)|कोतवाल]], [[साळुंकी]], [[भारद्वाज (पक्षी)|भारद्वाज]] इत्यादी पक्षीही इतर सामान्य पक्षांसमवेत दिसतात.
 
येथे प्राणी संग्रहालयही आहे. [[मोर]] व लांडोर, [[वाघ]], [[अस्वल]], [[हरीण]],[[काळवीट]], [[सांबर]],[[ससा|ससे]],[[बगळा|बगळे]],[[बदक|बदके]] [[काकाकुवा]] इत्यादी प्राणी व पक्षी पिंजराबंद आहेत.