"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
इतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
ओळ ६:
 
अखेर एक वेळ अशी येते जेव्हा ताऱ्याच्या गर्भातील सर्व हायड्रोजन ज्वलन होऊन संपतो. तेव्हा रूपांतरित हेलियमचे ज्वलन होण्यास सुरवात होते. अखेरीस जेव्हा हेलियम सुद्धा संपतो तेव्हा ताऱ्याचा पृष्ठभाग केंद्राकड़े कोसळतो. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तारा जितका आकाराने मोठा तितका हायड्रोजन ज्वलनाचा वेग जास्त असतो. यामुळे प्रचंड तारे कमी संख्येत असतात. आपल्या सुर्याचे इंधन संपायला १० हजार दशलक्ष वर्षे लागतील. तर सुर्याच्या केवळ ३ पट मोठा असणारा तारा ५०० दशलक्ष वर्षे च टिकेल.{{संदर्भ हवा}} जेव्हा तारा कोसळतो त्या वेळी त्याचा प्रचंड स्फोट होतो याला सुपर नोवा म्हणतात. सुपरनोवा नंतर तार्‍याचे प्रचंड द्रव्य आत कोसळ्ते, या प्रचंड द्रव्याचा दाब इतका अति असतो की अणूंमधील एलेक्ट्रोन बंध तुटतात आणि तार्‍याचे आकारमान मोठया प्रमाणात कमी होते. याची परिणिती तार्‍याचे गुरुत्वाकर्षण वाढण्यात होते.अशा प्रकारे सुपरनोव्हानंतर तारा हा वस्तुमानानुसार [[न्यूट्रॉन तारा]], [[पल्सार]] व कृष्णविवर बनतो.
 
=== चंद्रशेखर मर्यादा ===
भारतीय शास्त्रज्ञ चंद्रशेखर यांचे यातील योगदान फार महत्त्वाचे आहे. त्यांनी असा सिद्धांत मांडला, की सूर्या च्या १.४ पटी पेक्षा लहान असणारा तारा "श्वेत बटु" मध्ये रूपांतरित झाल्यानंतर आणखी कोसळत नाही. यात अखेर गुरुत्वाकर्षण आणि अणूच्या मूलभूत कणां च्या परस्पर विरोधी बलात समतोल साधला जातो. आणि तारा प्रचंड घनता असलेला " श्वेत बटु " तारा बनून स्थिरावतो. व्याध - ब हा तारा याचेच उदाहरण आहे. तसेच सूर्याच्या १.४ ते ३ पट वस्तुमान असलेल्या तार्‍यांमधे अणुकेंद्रे परस्परांत विलीन होऊन तार्‍यामध्ये फक्त [[न्यूट्रॉन]] कण शिल्लक राहतात. त्याहूनही जास्त वस्तुमान असलेल्या तार्‍यांचे कृष्णविवरात रुपांतर होते.
 
== स्टिफन हॉकिंग यांचे मत ==
कृष्णविवराच्या संदर्भात [[अॅल्बर्ट आइन्स्टाइन]] यांच्या [[सापेक्षतावादाचा सिद्धान्त|सापेक्षतावादाच्या सिद्धांताला]] [[स्टीफन हॉकिंग]] यांनी पुंज वादाची जोड देऊन नवी गृहिते मांडली होती. कृष्णविवरामध्ये प्रचंड [[गुरुत्वाकर्षण]] असते आणि त्यामुळे त्याच्या कक्षेत येणारे [[ग्रह]], [[तारे]] यांना हे विवर गिळत असते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे होते. या कृष्णविवरांच्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे प्रकाश किरणदेखील बाहेर पडू शकत नाहीत असे समजले जात होते. परंतु कृष्णविवरातून [[प्रकाश|प्रकाशाचे]] उत्सर्जन होत असल्याचे स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या गृहितकांच्या आधारे पटवून दिले होते. स्टीफन हॉकिंग यांच्या दाव्यानुसार कृष्णविवर नावाची गोष्टच नसते असा त्यांचा दावा आहे.<ref>{{cite journalsantosh |डी.ओ.आई.=10.1038/nature.2014.14583 | शीर्षक=Stephen Hawking: 'There are no black holes' | अनुवादीत शीर्षक=स्टिफन हॉकिंग:कृष्णविवराचे अस्तित्वच नाही | लेखक=झिया मेराली | जर्नल=[[नेचर]] | दिनांक=२४ जानेवारी २०१४| अॅक्सेसदिनांक= २६ जानेवारी २०१४ | दुवा=http://www.nature.com/news/stephen-hawking-there-are-no-black-holes-1.14583}}</ref>
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==