"उंबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
{{गल्लत|उंबरा}}
'''उंबर''' किंवा '''औदुंबर''' (शास्त्रीय नाव: ''Ficus racemosa'', ''फायकस रेसिमोझा'' ; कुळ: ''मोरेसी''; ) हा मुख्यतः [[भारत]], [[श्रीलंका]], [[म्यानमार]], [[ऑस्ट्रेलिया]] या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणार्‍या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात.<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.vishwakosh.org.in/kumarm/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=225 | शीर्षक = "उंबर" | प्रकाशक = मराठी कुमार विश्वकोश | भाषा = मराठी }}</ref> [[ब्लास्टोफॅगा सेनेस]] हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात.
==वापर==
 
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो.
 
उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. या झाडापाशी [[दत्त|दत्ताचे]] स्थान असते असे हिंदुधर्मीय समजतात आणि त्या वृक्षाला पवित्र मानतात.
 
याचे लाकूड पाण्यात दिर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा [[उंबरठा]] बनविण्यासाठी पूर्वी वापर होत असे.<ref name="लोकमत">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा =http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=9 लोकमत,नागपूर -ई-पेपर,दि.१३/०१/२०१४, पान क्र.११ | शीर्षक = '''विषशामक''' | भाषा = मराठी | लेखक = डॉ.हेमा साने | लेखकदुवा = | आडनाव = साने | पहिलेनाव = (डॉ.) हेमा | सहलेखक = | संपादक = | वर्ष = | महिना = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = | आर्काइव्हदिनांक = | कृती = | पृष्ठे = | प्रकाशक = लोकमत प्रकाशन | अ‍ॅक्सेसवर्ष = | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = | ॲक्सेसदिनांक = | अवतरण = }}</ref>त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.
 
हा शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते.<ref name="लोकमत"></ref>
 
==आख्यायिका==
[[विष्णू]]ने [[नृसिंहवतार|नृसिंहावतारात]] [[हिरण्यकश्यपू]] चा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याचेशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या.नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.[[लक्ष्मी]]ने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला.<ref name="लोकमत"></ref>
==आराध्यवृक्ष==
हा [[कृत्तिका]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उंबर" पासून हुडकले