"शहाजीराजे भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४१:
==पार्श्वभूमी==
[[राजस्थान]]च्या [[चित्तोडगढ]]च्या संग्रामात [[अल्लाउद्दीन खिलजी]]शी लढताना [[राणा लक्ष्मणसिंह]] नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित [[बाबाजीराजे भोसले]] यांच्या घरात [[मालोजीराजे भोसले]] आणि [[उमाबाई भोसले]] यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील [[लखुजीराव जाधव]] यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर [[इ.स. १६०५ ]] मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.
==अहमदनगरच्या निजामशाहीत==
[[मालोजीराजे भोसले]] आपला भाऊ [[विठोजीराजे भोसले]]इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहजींचे पिता मालोजीराजे यांनी लाखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.
 
=कारकीर्द=