"मिरची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:mirchi.JPG|thumb|right|मिरचीचे झाड]]
{{विस्तार}}
मिरची हे उष्ण कटिबंधीय [[अमेरिका]] येथील [[फळ]] आहे असे मानले जाते. याची [[चव]] तिखट असते. हे फळ रंहगाने बहुदा हिरवे असते. परंतु पिवळ्या व लाल रंगातही येते. दाट असतो. याची पाने गुळगुळीत, एकाआड एक अशी येतात. मिरचीच्या फळांमध्ये अ, ब, क आणि ई [[जीवनसत्त्वे]] असतात. तसेच यात [[कॅल्शिअम]], फॉस्फरस ही खनिजे असतात. मिरचीमध्ये असलेल्या कॅपसायसीन नावाच्या पदार्थामुळे मिरचीला तिखट चव प्राप्त होते.
 
==लागवड==
[[द. आफ्रिका]], [[ऑस्ट्रेलिया]], [[अर्जेंटिना]], [[ईजिप्त]], [[स्पेन]], [[चीन]], [[जपान]], [[व्हिएतनाम]], [[ब्रह्मदेश]], [[मलेशिया]], [[इंडोनेशिया]], [[पाकिस्तान]] या देशात मिरची लागवड केली जाते. मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रात [[नंदुरबार]] हे मिरचीच्या बाजारपेठेचे प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्यात मिरची पिकासाठी पोषक वातावरण असल्याने मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
==जाती==
*मुसळेवाडी सिलेक्‍शन
*अग्निरेखा
*फुले ज्योती
*संकेश्‍वरी
*ब्याडगी
*ज्वाला
*पंत सी १
* फुले सई
==मिरचीचे लाल तिखट बनविण्याची प्रक्रिया==
मिरची पिकल्यावर लाल होते.ती पिकल्यावर ओलसरच राहते.तीला मग उन्हात नीट वाळवुन पूर्णपणे सुकल्यावर मग ती कुटुन त्याचे स्वयंपाकात वापरावयाचे लाल तिखट बनते.सध्या मिरचीची अनेक वाणे(जाति) आहेत-अग्निरेखा,नंदिता रोशनी,ज्वाला,जयंती,२७५,ब्लॅक सीड इत्यादी अशी त्यांची नावे आहेत.[[नागपूर जिल्हा|नागपूर जिल्ह्याच्या]] [[भिवापूर]],[[कूही]] तालुक्यात व [[मांढळ]] येथे तर [[अचलपूर]]च्या पथ्रोट या गावीही मिरची पिकविल्या जाते.
==हे ही पाहा==
* [[ढोबळी मिरची]]
==बाह्य दुवे==
* [http://www.agrowon.com/Agrowon/20120717/5088655796459637880.htm तंत्र मिरची लागवडीचे...]
 
<gallery>
चित्र:Mirchi chunai3.JPG|कामगार ओल्या लाल मिरच्या ढीग बनविण्यासाठी नेतांना
Line १३ ⟶ २९:
 
</gallery>
 
{{clear}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरची" पासून हुडकले