"तानुबाई बिर्जे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''तानुबाई बिर्जे''' ह्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्...
(काही फरक नाही)

१५:४६, ६ जानेवारी २०१४ ची आवृत्ती

तानुबाई बिर्जे ह्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या संपादिका ठरल्या. कृष्णाजी भालेकर यांनी १८७७मध्ये सुरू केलेल्या ‘दिनबंधु’ या वृत्तपत्राचं संपादकपद १९०६ ते १९१२ या काळात तानुबाई बिर्जे यांनी साभाळलं. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या तानुबाईंनी संपादक म्हणून आपल्या अग्रलेखातून समाजातील विषमतेवर प्रहार करून त्याची चिरफाड केली. बहुजन शिक्षणाचा विचार मांडला. नाविन्यपूर्ण विषय हाताळले आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावलि.

मात्र, ज्यावेळी महिलांना चूल आणि मूल यापलीकडे पाहिलं जात नव्हतं, अशा काळात तानुबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि ती चोखपणे बजावली.