"कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:2002-dmuseum-luftfahrt-014-650.jpg|इवलेसे|जर्मनीतील संग्रहालयात ठेवलेले कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर.]]
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे विमानात संवादाच्या नोंदी ठेवणारे उपकरण आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये [[वैमानिक]], सहवैमानिक व मुख्य अभियंता, हवाई सुंदरींचे संवाद नोंदवले जातात. पूर्वी त्यासाठी [[चुंबकीय फित|मॅग्नेटिक टेपचा]] वापर केला जात असे. आता मेमरी चिप वापरली जाते. वैमानिक व इतर कर्मचार्‍यांतील संभाषण, [[वैमानिक कक्ष|वैमानिक कक्षातील]] आवाज, यंत्रांनी सावधगिरीचे इशारे होणारे आवाज यामध्ये ध्वनीमुद्रित होतात. याशिवाय [[विमानातळविमानतळ|विमानातळाच्या]] नियंत्रण कक्षाशी केलेले संभाषणही यात ध्वनीमुद्रित होत असते. विमानाला दिली गेलेली हवामानविषयक माहिती व इशारे इत्यादी सर्व गोष्टींचे ध्वनिमुद्रण यात होते. हे सुमारे दोन तासांसाठी होत असे व चुंबकीय फित पुसली जाऊन त्यावर नवीन [[ध्वनीमुद्रण]] घडत असे. यात काही काळाने फित खराब होऊन ती बदलावी लागत असे. आता नवीन डिजिटल तंत्रज्ञानामुळे हे करावे लागत नाही. तसेच ध्वनीमुद्रित करण्याला काल मर्यादाही मोठी झाली आहे. याचा अभ्यासाला उपयोग होतो.
== हे ही पाहा==
* [[फ्लाइट डेटा रेकॉर्डर]]