"समलैंगिकता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 96 langlinks, now provided by Wikidata on d:Q6636
No edit summary
ओळ १:
एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील [[लैंगिक आकर्षण]] व [[समागम]] क्रियेस '''समलैंगिकता''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Homosexual) म्हणले जाते.
 
समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, कला व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि 'अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन' ह्या महत्वाच्या वैद्यकियवैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धीकबौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्यिकोनानंतरदृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.
 
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना '[[लेस्बिअन]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना '[[गे]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.
 
समलैंगिक हे विशेषण जरी पूर्वकालीन लेखकांनी एकाच लिंगाच्या संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा (याला समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थानेच वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरुन लैंगिकतेव्यतिरिक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगीच्या प्रेमासाठी होमोफिलीया हा आणखी एक शब्द आहे.
 
काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषत: लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी,पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रितेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. शोचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये इंग्रजीप्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.
 
== मनुस्मृतिमधे समलैंगिकांना दिलेली शिक्षा ==
 
'''अमानुषीषु पुरुष उदक्यायामयोनिषु ।
रेतः सिक्त्वा जले चैव कृच्छ्रं सांतपनं चरेत् ॥''' ११.१७२ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.१७३)
अ-मनुष्यांत, मासिक पाळी येणार्‍या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये वीर्य शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे.
 
हे "सांतपन" म्हणजे काय? ते असे : (११.२१०-२१२)
...अश्नीयात्...
'''गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पि: कुशोदकम् ।
एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥'''
गोमूत्र, गाईचे शेण, दूध, दही, तूप कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय.
 
हे प्रायश्चित्त तितकेसे प्राणघातक वाटत नाही. पण योनीवेगळ्या ठिकाणी वीर्य शिंपडण्यास थोडातरी विरोध आहे. बहुधा प्रायश्चित्त जाहीररीत्या करणार्‍यास लोकलज्जेमुळे फार त्रास व्यावा, हीच शिक्षा असेल.
 
स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे!
७.३६९-३७०
'''कन्यैव कन्यां या कुर्यात् तस्या: स्याद द्विशतो दमः ।
शुल्कं च द्विगुणं दद्यात शिफाश्चाप्नुयाद दश ॥
या तु कन्यां प्रकुर्यात स्त्री सा सद्यो मौण्ड्यमर्हति ।
अङ्गुल्योरेव वा छेदं खरेणोद्वहनं तथा ॥'''
जी कन्याच कन्येशी (संभोग) करेल, तिला दंड दोनशे ("पण" ही मुद्रा) असावे. तिचे (विवाह-)शुल्क दुप्पट द्यावे, आणि तिला दहा छड्या मिळाव्यात.
पण जी स्त्री कन्येशी संभोग करेल, ती लगेच मुंडनास, दोन बोटे छाटली जाण्यास, वा गाढवावरून धिंड काढली जाण्यास पात्र ठरेल.
 
हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या कामसूत्र या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals (शिखंडी? मराठी शब्द?) लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप. <ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.aisiakshare.com/node/553#comment-7449 |शीर्षक=मनुस्मृति आणि समलैंगिकता |प्रकाशक=ऐसी अक्षरे |दिनांक=2012-02-24}}</ref>
 
आधुनिक वापरात, समलैंगिक स्त्रियांना '[[लेस्बिअन]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना '[[गे]]' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Gay) म्हणले जाते.
 
== कायदेशीर मान्यतेची स्थिती ==