"जयद्रथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 9 langlinks, now provided by Wikidata on d:Q2381146
No edit summary
ओळ २:
'''जयद्रथ''' हा [[महाभारत|महाभारतात]] उल्लेखिलेल्या [[सिंधु देश|सिंधु]], [[शिबि]] व [[सौवीर]] देशांचा राजा होता. [[धृतराष्ट्र]] व [[गांधारी]] यांची एकमेव कन्या असलेल्या [[दुःशला|दुःशलेशी]] याचा विवाह झाला. महाभारतीय युद्धात तो [[कौरव|कौरवांच्या]] पक्षातून लढला व [[अर्जुन|अर्जुनाच्या]] हातून मारला गेला. त्याच्या अनेक पुत्रांमध्ये सुरथ नावाचा एक पुत्र होता.
 
जयद्रथ हा पांडवांचा द्वेष करीत असे. त्याला बलाहक, आनीक, विदारण आदि सहा भाऊ होते. हा एका स्वयंवरासाठी शाल्व देशाला जात असताना काम्यकवन नावाच्या गावात मुक्कामाला होता. त्याच्यासह त्याचे सहा भाऊ, शिबिकुलाचा राजपुत्र कोटिक, त्रिगर्तराजपुत्र क्षेमंकर, इक्ष्वाकुकुलातला सुपुष्पित आणि कलिंगपुत्र होते. त्याशिवाय इतर बारा राजपुत्र आणि त्यांचे सैन्य होते. शिकारीसाठी गेला असताना जयद्रथ पांडवांच्या वनवासातील आश्रमापाशीपाशीआश्रमापाशी पोहोचला. तिथे फक्त द्रौपदी, तिची दासी आणि म्हातारे [[धौम्य ऋषी]] होते. जयद्रथाने आपल्या सैन्यासह तिथतिथे जाऊन द्रौपदीला रथात घालून पळवून नेले. ते पाहून धौम्य ऋषींनी रथाचा पाठलाग करण्याचा प्रयत्‍न केला. पांडवाणापांडवांना हे समजताच त्यांनी दूरंतरावरदूर अंतरावर गेलेल्या जयद्रथाला गाठले आणि त्याच्याशी लढाई केली. तीत अनेक राजपुत्र मारले गेले. संपूर्ण सेनेचा नाश झालेला पाहून जयद्रथ पळाला,आणि भीम-अर्जुनांना बऱ्याच शोधानंतर सापडला. भीमाने त्याला खूप बडवले आणि त्याच्या केसाचे पाच काढून त्याला आश्रमात आणले. त्याला मारून टाकले तर दु:शला आणि धृतराष्ट्र-गांधारी यांना फार दु:ख होईल म्हणून भीमार्जुनांनी शेवटी त्याला युधिष्ठिराच्या विनंतीवरून जिवंत सोडून दिले.
 
अशा प्रकारे पांडवांकडून अपमानित झालेल्या जयद्रथाने खूप तप केले व भगवान शंकरांकडून पांडवांच्यावर विजय मिळावा असा वर मागितला. शंकराने अर्जुनाच्या अनुपस्थितीत कोणताही पांडव तुला हरवू शकणार नाही असा वर दिला. त्यामुळेच अर्जुनाच्या अनुपस्थितीत चक्रव्यूह भेदायला अभिमन्यूबरोबर गेलेले पांडव जयद्रथाला हरवू शकले नाहीत, आणि शेवटी अभिमन्यू मारला गेला. त्याच्या प्रेताला जयद्र्तथानेजयद्रथाने लाथ मारली. हे समजल्यावर बाहेरून परत आलेल्या अर्जुनाने पुढच्या सूर्यास्ताच्या आत जयद्रथाला मारीन अशी प्रतिज्ञा केली. आणि आकाशात आलेल्या ढगांमुळे सूर्यास्त झाला असे समजून बाहेर पडलेल्या जयद्रथाला मारून अर्जुनाने ती प्रतिज्ञा पार पाडली.
 
{{महाभारत}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जयद्रथ" पासून हुडकले